‘आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचं हे फळं’; भालचंद्र नेमाडे भडकले

On: December 14, 2022 6:34 PM
---Advertisement---

जळगाव | ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी त्यांचं परखड मत मांडलं आहे.

सध्या राजकारणात खोक्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत, असं म्हणत भालचंद्र नेमाडे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलंय.

दहा ते पंधरा टक्के लोकांचे व्यवस्थित चालले असून अनेकांना मात्र उद्या काय खावं याची काळजी असते. त्यामुळे अशा लोकांनी आता कोणाला निवडून द्यावं याचा विचार केला पाहिजे तरच या लोकशाहीचा उपयोग होईल असं देखील भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.

चिनी सरकार आपला शत्रू असेल पण चीन हा आपला शत्रू म्हणणं चुकीचं असून चिनी सैनिक आपल्याकडे येतात मारामाऱ्या करतात हे चुकीचं आहे. मात्र आपले ही सैनिक तेच करतात, असंही नेमाडे म्हणालेत.

दरम्यान, सद्यस्थितीत राजकारणात चांगल्या लोकांना पडू नये अशी परिस्थिती झाली असून सर्वसामान्य माणसांना खोक्याची भाषा चालते का?, असा सवालही भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now