BH Number Plate | पुणे आरटीओकडून BH सीरिज (Bharat Series) नंबर प्लेट असणाऱ्या वाहनधारकांसाठी मोठा इशारा देण्यात आला आहे. गाडी खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरणं बंधनकारक आहे. मात्र अनेक वाहनधारक वेळेत कर भरत नसल्याचं समोर आलं असून, आता यावर कठोर कारवाई होणार आहे. (BH Number Plate)
दंड आणि थकीत रक्कम वसुली :
आरटीओने स्पष्ट केले आहे की, कराची मुदत संपल्यानंतर सात दिवसांच्या अवधीनंतर दररोज १०० रुपयांचा दंड लागू होईल. एवढंच नाही तर कर बाकी राहिल्यास वाहनाच्या नोंदणीवर बंदी घालण्याचीही शक्यता आहे. (BH Number Plate)
BH नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांसाठी कर न भरल्यास दंडाचा आकडा झपाट्याने वाढू शकतो. दररोज १०० रुपये दंडासोबतच विलंबानुसार अतिरिक्त रक्कमही आकारली जाईल. पुण्यात अशा वाहनांची संख्या हजारोंमध्ये असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने कर भरावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
BH Number Plate | काय नियम आहेत?
२०१९ मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमांनुसार, BH सीरिज क्रमांक असणाऱ्या वाहनधारकांनी गाडी खरेदी झाल्यानंतर दर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरणं बंधनकारक आहे. पण मुदत संपल्यानंतरही कर न भरल्याचे अनेक प्रकरणे आढळली आहेत. (BH Number Plate)
वाहनधारकांना कर भरण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. तसेच जवळच्या आरटीओ कार्यालयातूनही कर भरता येतो. आरटीओ अधिकारी स्वप्नील भारते यांनी सांगितले की, कर न भरल्यास न्यायालयीन कारवाईही सुरू केली जाऊ शकते.






