सावधान ! सकाळी उठल्यावर मोबाईल पाहिला तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

On: December 19, 2022 4:55 PM
---Advertisement---

मुंबई | सकाळी( Fresh Morning) उठल्यानंतरचा पहिला एक तास आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. कारण असं म्हणतात की, सकाळचा पहिला तास आपल्याला उर्जा देत असतो. त्यामुळं आपल्या दिवसाची सुरूवात चांगल्या विचारांनी (Morning Positive Thoughts) होणं अत्यंत गरजेचं असतं.

परंतु काहीजणांना अशी सवय असते की, सकाळी उठल्यानंतर पहिला मोबाईल(Mobile) हातात घेणे. परंतु तुमची ही सवय तुम्हाला धोक्याची ठरू शकते, कारण सकाळी उठल्यावर लगेचच मोबाईल हातात घेतल्यानं अनेक गंभीर आजार(Disease) होऊ शकतात.

सकाळी उठल्यावर मोबाईल वापरल्यानंतर तुमच्या शरीर आणि मेंदूच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येत असतो. त्यामुळं तुम्हाला अनावश्यक ताण येण्याची शक्यता असते.

सकाळी दिर्घ काळ मोबाईल वापरल्यानं तुमच्या मनक्यावर ताण येऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला मनका दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळं तुम्ही सकाळी मोबाईलचा वापर करणं टाळलं पाहीजे.

दरम्यान, काही तज्ञांनी दिवसाच्या पहिल्या तासात, आलेले मेसेज वाचण्यास आणि मोबाईल वापरण्यास सक्त मनाई केली आहे. त्यामुळं सकाळी उठल्यावर मोबाईल वापरण्याऐवजी उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, योगा केला पाहीजे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now