राम मंदिर उडवण्यासाठी बीडमधील तरुणाला ‘इतक्या’ लाखांचं आमिष; पाकिस्तानातून आला मेसेज!

On: August 2, 2025 10:02 AM
Ayodhya Ram Mandir Threat
---Advertisement---

Ayodhya Ram Mandir Threat | अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, बीडमधील एका तरुणाला थेट पाकिस्तानातून धमकीचा मेसेज आल्याचे उघड झाले असून, या प्रकरणाची तक्रार शिरूर कासार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. संबंधित तरुणाला या कटामध्ये सामील होण्यासाठी १ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, अशी माहिती पुढे आली आहे. (Ayodhya Ram Mandir Threat)

तरुणाच्या सोशल मीडिया खात्यावर आलेल्या या मेसेजमध्ये अयोध्येतील राम मंदिर आरडीएक्सने उडवण्याची योजना असल्याचे नमूद करण्यात आले. संशयित व्यक्तीने आपली ओळख पाकिस्तानी असल्याचे दाखवत कराचीचे लोकेशनही शेअर केले. याशिवाय, या कामात सहभागी होण्यासाठी आणखी ५० लोकांची गरज असल्याचे आणि सर्वांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येतील, असे मेसेजमध्ये म्हटले आहे.

पोलीसांनी घेतली दखल; गुन्हा दाखल करून तपास सुरू :

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित तरुणाने त्वरित शिरूर कासार पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून मेसेज कोणाकडून, कुठून आणि कशासाठी पाठवण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. (Ayodhya Ram Mandir Threat)

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मेसेज पाठवणाऱ्याने पाकिस्तानातील कराची येथील लोकेशन शेअर करत धमकी दिली होती. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकारामागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा तपास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ayodhya Ram Mandir Threat | याआधीही मिळाल्या आहेत धमक्या :

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधीही सप्टेंबर २०२४, जानेवारी २०२४ आणि एप्रिल २०२५ मध्ये अशाच धमक्या देण्यात आल्या होत्या. काही प्रकरणांत अटकही झाली होती. एप्रिलमध्ये मिळालेल्या ई-मेलमधून ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’ असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. त्यावेळी ई-मेल तामिळनाडूतून आल्याचे निष्पन्न झाले होते.

आता मात्र थेट पाकिस्तानातून बीडच्या तरुणाला असा मेसेज आल्याने राज्यात आणि देशात चिंता वाढली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील स्थळ आहे. त्यामुळे या प्रकाराकडे गृहमंत्रालयानेही गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.

News Title: Beed Youth Gets Message from Pakistan to Blast Ayodhya Ram Mandir – Shocking Plot Uncovered

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now