Suresh Dhas | जिल्हा पोलिस दलातील भास्कर केंद्रे (Bhaskar Kendre) हा कर्मचारी १५ वर्षांपासून परळीतच (Parli) आहे. त्याच्याकडे १५ जेसीबी (JCB) आणि १०० टिप्पर (Tipper) आहेत. यातून तो राखेची अवैध वाहतूक (Illegal Transportation of Ash) करतो. तसेच, मटक्यावाल्याशीही (Matka Operator) त्याची पार्टनरशिप (Partnership) आहे, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी विष्णू चाटे (Vishnu Chate) याच्या नावाने परळीतून ४६ कोटी रुपयांचे बिल काढल्याचा गंभीर आरोप भाजपचे (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे.
परळी ग्रामीण (Parli Rural), परळी संभाजीनगर (Parli Sambhajinagar), सिरसाळा (Sirsala) आणि बर्दापूर (Bardapur) पोलिस ठाण्यात १० ते १७ वर्षांपासून पोलिस एकाच ठिकाणी आहेत. त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी. वाल्मिक कराड (Walmik Karad) याला फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली, त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. पोलिसांनी त्यांनाही सहआरोपी करावे. परळी नगरपालिकेचे (Parli Municipality) स्पेशल ऑडिट करावे. कारण एकाच व्यक्तीच्या नावावर ४५ कोटी रुपयांची बिले काढली आहेत. यात विष्णू चाटेचाही समावेश आहे. एकाच रस्त्यावर पाच-पाच वेळा बिले काढल्याचेही आ. धस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना दिले पत्र
केंद्रे याच्या अवैध राख वाहतूक प्रकरणी आणि मटक्याशी असलेल्या त्याच्या संबंधाबाबत, तसेच विष्णू चाटेच्या नावाने काढलेल्या बिलाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र देऊन निवेदन केले आहे.
जर दोषी आढळले तर त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही आ. धस (Suresh Dhas) यांनी केली. यासंदर्भात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.
बियाणी आत्महत्येची चौकशी करावी
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या परवानाधारक बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली होती. यातही आ. धस यांनी संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
दुसरा कॉल व्हायरल
चार दिवसांपूर्वीच वाल्मिक कराड आणि बीड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक (Police Inspector) शीतलकुमार बल्लाळ (Sheetalkumar Ballal) यांच्या संवादाची कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल झाली होती. ही क्लिप व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेवर (Sunny Athavale) बीड पोलिसांनी (Beed Police) मकोका (MCOCA) लावला आहे. (Suresh Dhas)
Title : Beed Police Officer Owns 15 JCBs 100 Tippers Allegations by Suresh Dhas






