शाळेतील मुलांसमोर हात-पाय तोडण्याची भाषा, बीडच्या खोक्या भाईचा नवा व्हिडीओ समोर

On: March 7, 2025 1:10 PM
Beed News Khokya Bhai Threat Video Goes Viral
---Advertisement---

Beed News | बीड जिल्ह्यातील गुन्हेगार सतीश भोसले उर्फ खोक्या भाई (Satish Bhosale) याचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो शाळकरी मुलांसमोर धमकी देताना दिसतोय. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.  (Beed News)

व्हिडीओत तो म्हणतो की, “मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला तयार आहे. माझ्यावर आधीच मोठ्या केसेस आहेत, त्यामुळे आणखी एका केसने काही फरक पडत नाही.” हा व्हिडीओ समोर आल्यानंतर बीड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

खोक्या भाईवर गंभीर गुन्हे दाखल

बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर भागात सतीश भोसलेवर (Satish Bhosale) अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावर खूनाचा प्रयत्न, हत्येचा गुन्हा आणि जबरदस्तीने संपत्ती मिळवण्यासारख्या गंभीर प्रकरणांत गुन्हे नोंद आहेत.

  • कलम 307 (IPC 307) – प्रयत्नात्मक खून (Attempt to Murder) – 2021
  • कलम 498A (IPC 498A) – कौटुंबिक गुन्हा – 2020
  • कलम 304 (IPC 304) – ठार मारण्याचा प्रयत्न नसताना झालेला मृत्यू – 2020
  • BNS 115(2) – प्राणघातक हल्ला
  • BNS 118(1) – जबरदस्तीने संपत्ती मिळवणे
  • BNS 189(2) – शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणे
  • BNS 190 – फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर

संतोष देशमुख हत्या प्रकरण अपडेट 

दरम्यान, बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीच्या सेलू शहरात बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली. सकल मराठा समाजाने वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करत त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. (Beed News)

Title : Beed News Khokya Bhai Threat Video Goes Viral

 

Join WhatsApp Group

Join Now