200 हरणांची शिकार, तर कित्येक मोर पकडून खाल्ले; बीडच्या खोक्या भाईचे कारनामे उघड

On: March 7, 2025 8:55 AM
Satish Bhosale Arrested
---Advertisement---

Beed crime | बीड (Beed) जिल्ह्यातील शिरूर (Shirur) गावात सतीश भोसले उर्फ ‘खोक्या भाई’ (Satish Bhosale) याच्या दहशतीचे थरारक प्रकार उघडकीस आले आहेत. त्याला हरीण आणि मोरांची शिकार करण्याचा मोठा शौक होता. स्थानिकांच्या मते, त्याने आतापर्यंत 200 हून अधिक हरणांची शिकार केली असून, वागूर जाळे लावून मोर पकडले आहेत.  (Beed crime )

शिकारीला विरोध केल्याने मारहाण

आठ दिवसांपूर्वी सतीश भोसले आपल्या सहकाऱ्यांसह दिलीप ढाकणे (Dilip Dhakne) यांच्या शेतात हरणांची शिकार करत होता. दिलीप ढाकणे यांनी त्याला विरोध केला असता, खोक्या भाई आणि त्याच्या साथीदारांनी दिलीप ढाकणे व त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना बेदम मारहाण केली.

या अमानुष मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे आठ दात तुटले आणि जबडा फ्रॅक्चर झाला. त्यांच्या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तो लंगडत चालतो आहे. दोघांच्याही शरीरावर जखमांचे व्रण आहेत.

पोलिसांकडून दुर्लक्ष, गावकऱ्यांचा संताप

19 फेब्रुवारी 2025 रोजी मारहाणीनंतर दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. मात्र, एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इतकंच नाही तर, गावकऱ्यांच्या मते, खोक्या भाईला भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा पाठिंबा आहे, त्यामुळे पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Beed crime )

जर कारवाई झाली नाही, तर शिरूर बंद करून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली असून बीड पोलिसांनी खोक्या भाईला अटक करण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र, तो अद्याप फरार आहे.

Title : Beed crime Satish Bhosale aka Khokya Bhai Brutality Exposed 

 

Join WhatsApp Group

Join Now