‘ती’ एक चूक अन् ललित पाटील पोलिसांच्या जाळ्यात फसला!

On: October 18, 2023 4:08 PM
---Advertisement---

मुंबई | ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ससून (Sasoon Hospital) रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला आज साकीनाका (Sakinaka Police) पोलिसांनी ताब्यात घेतलं. ललितच्या ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. याशिवाय ललितला फरार करण्यामागे राजकारणातील बड्या नेत्याचा हात आहे अशा चर्चा सुरु होत्या.

ललितला अटक झाल्यानंतर त्याला मुंबईच्या अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर ललितने त्याच्यावरचे आरोप फेटाळले. दरम्यान ललितच्या एका चुकीमुळे त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. पुणे पोलिस ललितच्या मागावर असताना साकीनाका पोलिस ललित पाटीलसाठी सापळा रचत होते. 

साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ललित पाटील अलगद फसला. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. शिवाय गेल्या 15 दिवसांपासून फरार असलेला ललित पाटील महाराष्ट्रात कारने प्रवास करत होता. बेंगळूरमधील चेन्नासेंद्रा गावातील होटॅलमध्ये ललितला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now