भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे फेकली वस्तू, नेमकं काय घडलं?

On: April 19, 2024 9:01 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Baramati Loksabha | बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांचा बारामती बालेकिल्ला मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून भाजप प्रयत्नात आहे. मात्र ते अद्यापही भाजपला जमलं नाही. यासाठी आता भाजपने राष्ट्रवादी पक्ष फोडला. पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. यामुळे यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) पवार विरूद्ध पवार लढत होणार आहे. नणंद विरूद्ध भावजय अशी लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. (Baramati Loksabha)

शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी काल पुणे येथे बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला. त्यानंतर आज शरद पवार यांनी बारामती होमग्राऊंडला भेट दिली. त्यांनी सभेतून उपस्थितांना संबोधित केलं. ते बोलत असताना उपस्थितांमधून एकाने शरद पवार यांच्या अंगावर एक वस्तू फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यावेळी फेकलेली वस्तू शरद पवार यांच्या बॉडीगार्डने झेलली.

कन्हेरी गावात बोलत असताना शरद पवार म्हणाले की, आपण प्रचाराची सुरूवात ही कन्हेरी गावातून करतो. गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. यावेळी शरद पवार यांनी एका वृद्ध कार्यकर्त्याला नावानिशी ओळखलं. आपण गुरूजी ना? शरद पवार यांनी त्यांचं वय विचारलं असता, 94 वय असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर शरद पवार म्हणाले आपण माझ्यापेक्षा वडील आहात?.

नेमकं काय घडलं ?

शरद पवार सभेत बोलत असताना, उपस्थितांकडून शरद पवार यांच्याकडे एक वस्तू फेकण्यात आली. ती शरद पवार यांच्यामागे उभा असलेल्या बॉडीगार्डने पकडली. नेमकी फेकलेली वस्तू काय होती? असा अनेकांना व्हिडीओ पाहिल्यावर प्रश्न पडला असेल. मात्र तो माईक असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, घडलेल्या प्रकारावर शरद पवार यांच्या मागे उभा असणाऱ्या बॉडीगार्डच्या चेहऱ्यावर राग पाहायला मिळाला. त्याने एकही शब्द न बोलता त्याच्या चेहऱ्यावरील लालबुंद राग पाहायला मिळत होता.

अमित शहांवर हल्ला

अमित शहांवर शरद पवार यांनी सभेला संबोधित करत असताना हल्ला केला आहे. हे सरकार घटना बदलणार असल्याचं सांगत आहेत. त्यानंतर शरद पवार म्हणाले अमित शहा नावाचे गृहस्थ आहेत, त्यानंतर उपस्थितांनी लगेचच तडीपार म्हणत अमित शहांवरील संताप व्यक्त केला.

News Title – Baramati Loksabha In Some Present Guy Throw Lepal Mic At Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या

‘सुनेला हिणवणाऱ्या पवारांना सीतामाईंचा कळवळा म्हणजे ढोंगच’, भाजपचा टोला

बसमध्ये तरूणी आली बिकिनी घालून, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा’चा जलवा, कमावले तब्बल 500 कोटी रुपये

आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत थेट बोलला मलायका अरोराचा मुलगा, म्हणाला…

आधी गणपतीचं दर्शन आता दर्ग्यावर चढवली चादर, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये

Join WhatsApp Group

Join Now