Baramati Loksabha | लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने शिवसेना पक्षात उभी फूट पाडली. तर त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फोडला. पक्षावर वर्चस्व करण्याच्या नादात पक्ष फुटला का? असा सवाल माजी कृषिमंत्री शरद पवार यांना करण्यात आला. तेव्हा शरद पवार यांनी वर्चस्वामुळे हा पक्ष फूटला नसल्याचं सांगितलं.
वर्चस्वातून पक्षात फूट पडली?
पक्षावर वर्चस्व मिळवण्याच्या नादात पक्षात उभी फूट पडली आहे का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. तेव्हा शरद पवार यांनी उत्तर दिलं, त म्हणाले की, नाही पक्षातील वर्चस्वातून फूट पडली नाही. एजन्सींचे चौकशीचे जे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे अनेक सहकारी अस्वस्थ झाले. त्यामुळे सहकाऱ्यांनी हे कृत्य केल्याचं समजतंय. काही नेत्यांच्या कुटुंबातील अडचण ही अत्यंत अवघड झाली होती, असं शरद पवार म्हणाले.
जुन्या सहकाऱ्यांना संधी देणार का?
2019 मध्ये अजित पवार यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली. परत ते पक्षात आले. त्यांनी केलेली चूक त्यांनी कबूल केली होती. त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. अशीच भूमिका राष्ट्रवादीतील जुन्या सहकाऱ्यांसोबत घेणार का? असा सवाल शरद पवार यांना केला. तेव्हा शरद पवार म्हणाले की ते येतील तेव्हा निर्णय घेऊ. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत ते येतील असं वाटत नसल्याचं शरद पवार म्हणालेत.
दरम्यान, 400 पार जागा केल्यानंतर संविधान बदललं जाण्याची शक्यता आहे का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावेळी शरद यांनी भाजपच्या चार खासदारांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत देशातील संविधान बदलण्याचं संकट नाकारता येणार नाही असं शरद पवार म्हणाले.
News Title – Baramati Loksabha An Why split in NCP? Sharad Pawar replied
महत्त्वाच्या बातम्या
अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून प्रचंड विरोध; मतदारांनी बॅनरबाजी करत केला रोष व्यक्त
“पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी धनंजय मुंडेंचा डाव?”
मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…






