जुलै महिन्यात बँकांना तब्बल 13 दिवस सुट्ट्या राहणार; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

On: July 1, 2025 3:39 PM
Bank Holidays
---Advertisement---

Bank Holiday | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जुलै 2025 मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहणार असून, यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच राज्यानुसार साजरे होणारे स्थानिक सण-उत्सव यांचा समावेश आहे.

अनेक व्यवहार आज डिजिटल स्वरूपात सहज होतात, मात्र केवायसी अपडेट, रोकड व्यवहार, लॉकर सेवा, खाते बंद करणे यांसारखी कामे बँकेतच जाऊन करावी लागतात. त्यामुळे कोणत्या दिवशी बँक चालू आहे हे जाणून घेणे आवश्यक ठरते. (Bank Holiday)

जुलै 2025 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी :

3 जुलै (बुधवार) – त्रिपुरा: खारची पूजा

5 जुलै (शनिवार) – जम्मू व श्रीनगर: गुरु हरगोबिंद जयंती

6 जुलै (रविवार) – देशभर सुट्टी

12 जुलै (शनिवार) – दुसरा शनिवार, देशभर सुट्टी

13 जुलै (रविवार) – देशभर सुट्टी

14 जुलै (सोमवार) – मेघालय: बेह दिनखलाम सण

16 जुलै (बुधवार) – उत्तराखंड: हरेला सण

17 जुलै (गुरुवार) – मेघालय: यू तिरोट सिंग स्मृतिदिन

19 जुलै (शनिवार) – त्रिपुरा: केर पूजा

20 जुलै (रविवार) – देशभर सुट्टी

26 जुलै (शनिवार) – चौथा शनिवार, देशभर सुट्टी

27 जुलै (रविवार) – देशभर सुट्टी

28 जुलै (सोमवार) – सिक्कीम: द्रुकपा त्शे-जी पुण्यतिथी

Bank Holiday | ऑनलाइन बँकिंगचा पर्याय ठरतोय फायदेशीर :

बँक बंद असल्यास, UPI, नेट बँकिंग, मोबाईल अ‍ॅप, आणि एटीएम सेवा उपलब्ध असतात. विशेषतः UPI सेवा सुट्टीच्या दिवशीही 24×7 कार्यरत राहते. त्यामुळे तातडीच्या व्यवहारांसाठी डिजिटल बँकिंगचा वापर करावा. (Bank Holiday)

तसेच, आपल्या स्थानिक बँक शाखेच्या सुट्ट्यांबाबत खात्री करूनच बँकेत भेट देणे गरजेचे आहे, कारण वरील यादीतील काही सुट्ट्या राज्यनिहाय आहेत.

News Title: Bank Holidays in July 2025: Check RBI’s Full List of 13 Bank Closure Days

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now