बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

On: April 25, 2024 11:59 AM
Bank Holiday List In January
---Advertisement---

Bank Holiday l एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर मे महिना सुरू होणार आहे. पण यावेळी मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार आहेत हे तुम्हाला माहिती असं गरजेचं आहे. RBI ने मे 2024 च्या बँक सुट्ट्यांची यादी देखील जारी केली आहे. मे महिन्यात शनिवार, रविवार असे एकूण मिळून 12 दिवस बंद राहणार आहेत.

तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद :

मे 2024 मध्ये एकूण 12 दिवसांच्या बँक सुट्ट्यांपैकी 4 दिवस रविवार आहेत. त्यामुळे देशात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बँकेला सुट्टी असेल की नाही असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर या दिवशी देखील बँका बंद राहणार आहेत. 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीया हा सण असून या काळात बँका बंद राहणार आहेत. मात्र अक्षय्य तृतीयेला संपूर्ण देशात नव्हे तर काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

Bank Holiday l बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर :

5 मे : रविवार
८ मे: रवींद्रनाथ टागोर यांची जयंती
10 मे: बसव जयंती/अक्षय तृतीया
11 मे: दुसरा शनिवार
12 मे : रविवार
16 मे: राज्य दिनाच्या सुट्टीमुळे गंगटोकमधील सर्व बँका बंद राहतील.
19 मे : रविवार
20 मे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, बेलापूर आणि मुंबईतील सर्व बँका बंद राहतील.
23 मे : बुद्ध पौर्णिमा
25 मे : चौथा शनिवार
26 मे : रविवार

मे महिन्यात बँका जरी बंद असल्या तरी देखील तुम्ही एटीएम कार्डद्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता. तसेच डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढता येतात. जर तुम्हाला एखाद्याच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्ही ऑनलाइन बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता.

News Title : Bank Holiday In May 2024

महत्त्वाच्या बातम्या-

पुरुषांपेक्षा महिला डॅाक्टरांनी उपचार केल्यास मृत्यू दरात घट, नव्या अभ्यासातून खुलासा

450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; पंकजा मुंडेंकडे एकूण संपत्ती किती?

मी स्वत:ला पुरस्कारासाठी कधीच पात्र समजत नाही; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

येत्या तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल होणार; ‘या’ भागांना हायअलर्ट

“आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर 2 दारु विक्रीचे परवाने”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now