बँकेत FD करताय? थांबा! कोणत्या बँकेत मिळतोय जास्त फायदा? जाणून घ्या एका क्लिकवर

On: April 7, 2026 4:40 PM
Bank FD Interest Rates
---Advertisement---

Bank FD Interest Rates | दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव (FD) हा सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. बचत खात्याच्या तुलनेत एफडीवर जास्त व्याजदर मिळत असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार या पर्यायाला प्राधान्य देतात. निश्चित कालावधीसाठी ठराविक व्याजदराने पैसे गुंतवण्याची सुविधा असल्यामुळे एफडी ही स्थिर परतावा देणारी गुंतवणूक मानली जाते.

एफडीची मुदत साधारणपणे 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत असू शकते. मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला मुद्दल आणि व्याज एकत्रितपणे परत मिळते. अनेक गुंतवणूकदार व्याजदर समाधानकारक असल्यास एफडीचे नूतनीकरण देखील करतात. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर तपासणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

कोणत्या बँकेत एफडीवर किती व्याजदर? :

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर देते. सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा दर 6.45 टक्के असून ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.95 टक्के इतका आहे. तर 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.05 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. (SBI FD Rates)

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) एक वर्ष तीन महिने ते एक वर्ष सहा महिने कालावधीच्या एफडीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.20 टक्क्यांपर्यंत व्याजदर देते. तर सामान्य ग्राहकांसाठी या कालावधीतील सर्वाधिक व्याजदर 6.70 टक्के आहे.

Bank FD Interest Rates | खासगी बँकांचे व्याजदर :

HDFC बँक 18 महिने ते 3 वर्षांच्या एफडीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.95 टक्क्यांपर्यंत व्याज देते. सामान्य ग्राहकांसाठी या बँकेचा सर्वाधिक व्याजदर सुमारे 6.50 टक्के आहे. हा दर 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर लागू होतो. (HDFC Bank FD Interest)

दरम्यान येस बँक (Yes Bank) ही बँक सध्या सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांपैकी एक मानली जाते. 3 ते 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. सामान्य ग्राहकांसाठीही या कालावधीत सुमारे 7 टक्के व्याजदर मिळतो. (Bank FD Interest Rates)

तसेच ICICI बँक 3 ते 5 वर्षांच्या ठेवींवर आणि 5 वर्षांच्या टॅक्स-सेव्हर एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्क्यांपर्यंत व्याज देते. सामान्य गुंतवणूकदारांसाठी या बँकेचा सर्वाधिक व्याजदर सुमारे 6.50 टक्के आहे.

News Title: Bank FD Rates Update: SBI, HDFC, ICICI and Yes Bank Latest Fixed Deposit Interest Rates

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now