पाकिस्तानवर आणखी एक संकट! सोन्याचा साठा धोक्यात; अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसणार?

On: May 10, 2025 1:51 PM
Pakistan Economic Crisis
---Advertisement---

Pakistan Economic Crisis | पाकिस्तानमध्ये आतंरिक अशांतता आणि भारताशी तणाव असताना बलुचिस्तान (Balochistan) प्रांताने नव्या संकटाची चिन्हं दाखवायला सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा ताणले गेले असताना बलुचिस्तानमध्ये ‘बलूच आर्मी’कडून हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे. पाकिस्तानच्या सरकारी यंत्रणा, लष्कर आणि महत्वाच्या गाठ्यांवर या गटाने लक्ष्य ठेवायला सुरुवात केली आहे. बलुचिस्तानला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळावी, ही प्रमुख मागणी पुढे होत आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आघात होणार?:

बलुचिस्तान (Balochistan) पाकिस्तानच्या दृष्टीने केवळ भौगोलिकच नव्हे तर सामरिक आणि आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाचा प्रांत आहे.

अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर असलेला हा भाग ३,४७,१९० चौरस किमी इतका मोठा आहे, जो पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या सुमारे ४४ टक्के आहे. जर हा भाग पाकिस्तानपासून वेगळा झाला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आघात होणार आहे.

Pakistan Economic Crisis | सोनं-तांब्याचे खजिने पण वादात अडकले? :

बलुचिस्तानमध्ये (Balochistan) प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे. यामध्ये सोनं, तांबं, नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. एका अंदाजानुसार या भागात ५.९ अब्ज टन खनिज साठा आहे. यातच रेको डिक ही जगातील सर्वात मोठी अविकसित तांब्याची आणि सोन्याची खाण आहे. येथे अंदाजे ६० दशलक्ष औंस (सुमारे १७०० टन) सोनं आणि १७४ लाख कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा तांब्याचा साठा असल्याचं म्हटलं जातं.

मात्र पाकिस्तान सरकार, बॅरिक गोल्ड आणि चिलीच्या अँटोफगास्टा पीएलसी यांच्यातील वादामुळे ही खाण अजूनही पूर्ण क्षमतेने वापरात आलेली नाही. जर बलुचिस्तान पाकिस्तानपासून विभक्त झाला, तर हे सर्व खनिज साठे पाकिस्तानच्या हातून जाण्याचा धोका आहे आणि त्याचबरोबर ऊर्जा संकटही गडद होईल.

News Title: Balochistan Crisis May Cost Pakistan Its Gold Reserves and Trigger Economic Collapse

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now