टक्कल व्हायरसमुळे लग्नच जुळेना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

On: January 18, 2025 5:55 PM
Baldness Problem
---Advertisement---

Baldness virus l बुलढाण्यातील शेगाव (Shegaon) मधील काही गावांमध्ये केसगळतीचे (Hair Fall) प्रमाण वाढले असून, लोक अचानक टकले (Bald) व्हायला लागले आहेत. या विचित्र प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीवरून (Delhi) डॉक्टरांचे पथक (Team of Doctors) येऊनही यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. त्यातच भर म्हणजे, या गावातील तरुणांना आता मुली मिळणे कठीण झाले आहे. या विचित्र आजारामुळे त्यांचे लग्न जुळत नसल्याने गावकरी हतबल झाले आहेत.

ऐन लग्नसराईत (Wedding Season) टक्कल व्हायरसचा फटका :

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात केसगळतीच्या आजाराने (Disease) अनेकांना त्रस्त केले आहे. या आजाराचे रुग्ण सापडलेल्या बोंडगावात (Bondgaon) आता कोणीही लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही.

‘टक्कल व्हायरस’च्या भीतीने या गावाशी सोयरीक (Relationship) जुळत नसल्याचे चित्र आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत लग्नाला आलेल्या मुलांना कोणीही मुली देत नसल्याने, तसेच मुलींनाही लग्नासाठी मागणी येत नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

टक्कल होण्याची भीती :

आपल्या मुलालाही ‘टक्कल व्हायरस’ची लागण होईल या भीतीने पालक या गावातील मुलांना मुली देत नाहीत. तर, बोंडगावातील मुलगी सून (Daughter-in-law) म्हणून आणली तर आपल्या घरात आणि गावात ‘टक्कल व्हायरस’ पसरेल या भीतीने इतर गावांतील लोक बोंडगावातील मुलींना मागणी घालत नसल्याचे समोर आले आहे.

गावकरी हतबल :

या विचित्र आजारामुळे आधीच त्रस्त असलेल्या गावकऱ्यांसमोर आता हे नवीनच संकट उभे ठाकले आहे. या प्रकारामुळे तरुण आणि त्यांचे पालक हतबल झाले असून, या समस्येवर लवकरात लवकर तोडगा (Solution) निघावा अशी अपेक्षा ते करत आहेत.

News Title : Baldness virus creates panic in Buldhana, youths facing marriage issues

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now