जबरदस्त फीचर्ससह खिशाला परवडणारी बजाजची नवीन बाईक लाॅंच

On: December 20, 2022 2:31 PM
---Advertisement---

मुंबई | सध्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्या एकापेक्षा एक गाड्यांचे माॅडेल बाजारात आणत आहेत. त्यातच ग्राहक गाडी घेताना जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांचा जास्त विचार करतात. म्हणूनच जर तुम्ही जास्त मायलेज देणाऱ्या गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

बजाज कंपनी ही अॅटोमोबाईल क्षेत्रातील एक लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीच्या गाड्यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातच आता कंपनीनं जबरदस्त फीचर्स असलेली एक नवीन गाडी लाॅंच केली.

बजाजच्या नवीन गाडीचं नाव बजाज प्लॅटिना 110 ABS(Bajaj Platina 110 ABS) आहे. ही गाडी सध्या चार कलरमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची प्रारंभिक किंमत 72,224 रूपये असणार आहे.

या नव्या बजाज प्लॅटिना 110 ABS चे खास वैशिष्ट(Bajaj New Bike Features) म्हणजे या गाडीमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट कस्लर दिले आहे, जे तुम्हाला बरीच माहिती प्रदर्शित करणार आहे. या द्वारे तुम्हाला ABS अलर्ट देखील मिळणार आहे.

या गाडीची 17 इंच चाके आहेत. तर 11 लिटरची इंधन क्षमता असलेली टाकी आहे. त्यामुळं या गाडीची अॅटो बाजारात चांगलीच चर्चा रंगली आहे. तुम्ही जबदस्त फीचर्स असलेली आणि खिशाला परवडणाऱ्या गाडीचा विचार करत असाल तर तुम्ही या गाडीची अधिक माहिती घेऊन ही गाडी खरेदी करू शकता.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now