रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

On: February 20, 2024 7:41 PM
IPL 2024
---Advertisement---

मुंबई | इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या आधी, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवून सर्वांनाच धक्का दिला होता. यानंतर एमआयचे चाहते चांगलेच संतापले आणि लाखो लोकांनी सोशल मीडियावर टीमला अनफॉलोही केले. परंतु यानंतरही मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात सर्व काही सुरळीत झालेलं नाही. 22 मार्चला आयपीएल सुरू होणार आहे.

ट्रेड विंडोच्या माध्यमातून खरेदी विक्री करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण हे सर्व घडत असताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आयपीएल संघात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना संधी मिळाली आहे. पण रोहित शर्माला वगळण्यात आलं आहे.

रोहितच्या चाहत्यांना धक्का

एमएस धोनी आयपीएलचा सर्वकालीन आवडता कर्णधार म्हणून उदयास आला आहे ज्याने CSK ला पाच विजेतेपद मिळवून दिले आहेत. मात्र मुंबई इंडियन्सने पाचवेळा विजेतेपद पटकावलं असले तरी रोहित शर्माला (Rohit Sharma) संघात स्थान नाही. रोहित शर्मा हा एक उत्तम कर्णधार असला तरी एमएस धोनीच्या तुलनेत त्याचे नेतृत्व कमकुवत आहे.

विराट कोहलीपासून मिस्टर आयपीएलपर्यंत सुरेश रैनाचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सूर्यकुमार यादव आणि मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेले एबी डिव्हिलियर्स हे देखील या संघाचा भाग आहेत.

याशिवाय अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, किरॉन पोलार्ड या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर फिरकीपटूंमध्ये राशिद खान, सुनील नरेन आणि युझवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहचाही वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दिग्गजांनी निवडलेला सर्वकालीन संघ

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, किरॉन पोलार्ड, रशीद खान, सुनील नरेन, युझवेंद्र चहल, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मला वाटतंय, ऐश्वर्यांने आराध्याला कायमच…’; अभिषेक बच्चनचं लेकीबाबत मोठं वक्तव्य

‘ते म्हणतात की तुम्ही भा**** आहात’; भुजबळांनी विधानसभेत केली जरांगेंची तक्रार

दंगलफेम सुहानीच्या मृत्यूची अफवा?; अभिनेत्रीच्या ‘त्या’ एका पोस्टमुळे खळबळ

अन् रागाच्या भरात मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकली, वाचा नेमकं काय घडलं?

“..तिथे तुम्हाला ऐश्वर्या राय नाचताना दिसेल”, ‘या’ नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now