“अशी क्रूरता औरंगजेबानेही…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणी बच्चू कडू यांचा संताप

On: March 4, 2025 3:41 PM
Bachchu Kadu
---Advertisement---

Bachchu Kadu | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेवर राजकीय क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय.

“औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य” 

बच्चू कडू म्हणाले की, “या हत्येची पद्धत पाहिली तर असं वाटतं की, एवढी निर्घृण हत्या कदाचित कोणत्याही शत्रूनेही केली नसती. औरंगजेबानेही एवढं क्रूर कृत्य केलं नसेल.”

त्यांनी या प्रकरणाला जातीच्या चौकटीत पाहू नका, असा इशारा देत सांगितले, “ही दोन जातींमधील लढाई नाही, तर ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती वाढली कशी? याला खतपाणी घालणारे कोण? याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची नाही का?”, असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा

दरम्यान, या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी हा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात होती. त्यातच काल रात्री हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही मागणी अजूनच तीव्र झाली. आखरे आज सकाळी (4 मार्च) मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर  मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंवर IPC 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांची नार्को टेस्टही करावी, अशी मागणी केली जात आहे.

Title : Bachchu Kadu on Santosh Deshmukh Murder Case 

 

Join WhatsApp Group

Join Now