अमित शहांच्या सभेआधी मोठा राडा, बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले

On: April 23, 2024 4:30 PM
---Advertisement---

Bachchu Kadu | सायन्सकोर मैदानावरुन नवनीत राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) आमने-सामने आले आहेत. उद्या या मैदानावर अमित शाह यांची सभा होणार आहे. सभेआधीच मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय.

बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले

बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचं दिसून आलं. पहिला आम्हाला परवानगी दिली आणि नंतर ती रद्द करून त्याच ठिकाणी अमित शाहांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे आमदार बच्चू कडू संतापले. कायदा राखण्याचं काम करणाऱ्या पोलिसांनीच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला.

बच्चू कडूंचा गंभीर आरोप

पोलिसांनी आपल्या गाडीवर भाजपचे झेंडे लावावेत, त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं होतंय असा आरोपही बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला.

सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे ही भरले. पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. अमित शहा यांच्या सभेसाठी पूर्ण जय्यत तयारी सुरू आहे. परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पार्थला भाऊ म्हणून सांगतो…”, रोहित पवारांचा उपरोधिक टोला

“मंगळसूत्र कशासाठी?…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

हार्दिक पांड्या T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो!

घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानने घेतला सर्वात मोठा निर्णय!

आम्ही स्वतःला सुरुवातीलाच अडचणीत आणलं!, हार्दिकनं पराभवाचं खापर फोडलं रोहित शर्मावर!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now