बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट्स समोर

On: October 24, 2024 3:32 PM
Baba Siddique
---Advertisement---

Baba Siddique Murder l दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या केली आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई या गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता या गोळीबारात आणि हत्येच्या कटात गुरमैल सिंह व मोहम्मद झिशार अख्तर यांच्यातील दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील ही 11 वी अटक :

यासंदर्भात आधी माहिती अशी की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी अमित हिसामसिंह कुमार (२९) याला देखील गुन्हे शाखेने अटक केली. मात्र आता अमित हिसामसिंह कुमार याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून न्यायायलयाने त्याला आता पोलीस कोठडी सुनवली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणातील ही 11 वी अटक आहे.

या घटनेप्रकरणी अमित कुमार हा हरियाणा येथील कैठाल तालुक्यातील नाथवान पट्टी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचणारा मोहम्मद झिशान अख्तर याच्या संपर्कात अमित कुमार असल्याचे समजत आहे. तसेच मोहम्मद झिशान अख्तरच्या सांगण्यावरून त्याने गुरमैलला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी होण्यास सांगितले होते.

Baba Siddique Murder l अमित कुमारवर हरियाणा येथे तब्ब्ल चार गुन्हे दाखल :

अमित कुमारवर हरियाणा येथे तब्ब्ल चार गुन्हे दाखल असून त्यात मारामारीच्या गुन्ह्यांचा देखील सहभाग आहे. तसेच या हत्येच्या कटातील काही रक्कम आरोपीपर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक तपासात देखील निष्पन्न झाले आहे. मात्र आता त्याची तपासणी सध्या सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

याशिवाय आरोपी कोणत्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे,यासंबंधित तपासणी सुरू असल्याचे देखील अधिकाऱ्याने सांगितले आहे.याशिवाय आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे काम सध्या सुरु आहे.

News Title : Baba Siddique Murder

महत्वाच्या बातम्या –

महाविकास आघाडीने आखला मोठा प्लॅन! सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार?

मावळमध्ये महायुतीत फुट, राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होताच भाजपचं राजीनामासत्र

आपला झेंडा, आपला अजेंडा! जरांगे पाटील आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काय ठरलं?

विधानसभा निवडणुकीवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य!

ग्राहकांना झटका! दिवाळीपूर्वीच सोनं गेलं 80 हजार पार?; जाणून घ्या आजचे भाव

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now