Manoj Jarange l गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे वारंवार आक्रमक होताना दिसत आहेत. मात्र आता विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच आता उमेदवारी अर्ज भरण्याचा देखील सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही :
मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर लक्ष ठेवून असणाऱ्या मनोज जरांगे यांनी एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही असं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळवणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभेच्या ताेंडावर मनोज जरांगे कोणते राजकीय गणित जुळवतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
याशिवाय मनोज जरांगे विधानसभेला 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं वारंवार बोलत होते. परंतु आता महाराष्टातील काही मतदारसंघांमध्येच उमेदवार उभे करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. याशिवाय प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. कारण चिन्ह आल्याशिवाय उमेदवारी अर्ज भरण्याचा उपयोग नाही असं मनोज जरांगे आता म्हणाले आहेत.
Manoj Jarange l मनोज जरांगे पाटील संभ्रमात :
दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. मात्र 29 ऑक्टोबर 20024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. मात्र आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे एकाच वेळी ते मतदारसंघ निहाय उमेदवार जाहीर करणार असल्याचं बोलत आहेत. तर दुसरीकडे एकच उमेदवार ठरवण्याचं काम आज फायनल करू असेही ते म्हणाले आहेत.
त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे हेच संभ्रमात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र आता मनोज जरांगे काय ठोस निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News Title : Manoj Jarange Satement On Vidhansabha
महत्वाच्या बातम्या –
‘दाना’ चक्रीवादळामुळे 56 टीम्स हाय अलर्टवर; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
भुजबळ बंडखोरीवर ठाम, नांदगावमध्ये महायुतीचं टेंशन वाढणार?
पुण्यात घडली दुर्दैवी घटना! तीन जणांचा जागीच मृत्यू
AB फॉर्म म्हणजे नेमकं असतं तरी काय?, निवडणुकीत याला इतकं महत्व का?
‘या’ मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना; पाहा कुणाचं पारडं भारी?






