महाविकास आघाडीने आखला मोठा प्लॅन! सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार?

On: October 24, 2024 2:21 PM
Mahavikas Aaghadi
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढत होणार आहे. यावेळी दोन्ही आघाडी पक्षांनी दंड थोपटलेले पाहायला मिळत आहेत. अशातच सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार पर्यटन करत आहे. तर महाविकास आघाडीने या विधानसभेसाठीच मोठा प्लॅन आखला आहे.

माविआचा मोठा प्लॅन :

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कारण अरविंद केजरीवाल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस साठी महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता केजरीवाल झारखंडसोबतच महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहणार आहेत. केजरीवालांनी महाराष्ट्रात प्रचार सभा घेतल्यास महायुतीला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra l महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी येणार सभा घेणार :

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. कारण महाराष्ट्रात लोकसभेला भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी स्वतः या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय महाराष्ट्रात महायुतीच्या नेत्यांसाठी आणि उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात अनेक सभांचा धडाका लावण्याची दाट शक्यता आहे. तसेच दिवाळी या सणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सभा घेतल्यास महाविकास आघाडी समोर महायुतीला रोखणं एक आव्हानच असणार आहे.

News Title : arvind kejriwal maharashtra vidhansabha 

महत्वाच्या बातम्या –

आपला झेंडा, आपला अजेंडा! जरांगे पाटील आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काय ठरलं?

विधानसभा निवडणुकीवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य!

ग्राहकांना झटका! दिवाळीपूर्वीच सोनं गेलं 80 हजार पार?; जाणून घ्या आजचे भाव

BSNL ने वाढवलं टेलिकॉम कंपन्यांचं टेंशन, आता 5G च नाही तर..

‘दाना’ चक्रीवादळामुळे 56 टीम्स हाय अलर्टवर; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now