ममता कुलकर्णीला सराव… रामदेव बाबा ममताबद्दल हे काय बोलून गेले!

On: January 27, 2025 5:46 PM
Baba Ramdev Reacts on Mamata Kulkarni Mahamandaleshwar post 
---Advertisement---

Baba Ramdev | बॉलिवूडची एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने अचानक संन्यास घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तब्बल 24 वर्षांपासून चित्रपटसृष्टी आणि भारतापासून दूर असलेली ममता अचानक महाकुंभात (Mahakumbh) किन्नर आखाड्याची (Kinnar Akhada) महामंडलेश्वर (Mahamandaleshwar) बनून परतली आणि यामुळे चर्चेला उधाण आले आहे. यावरून तिच्यावर टीका होत असतानाच योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका दिवसात कोणीही संत होऊ शकत नाही, यासाठी कठोर साधना करावी लागते, असे म्हणत बाबा रामदेव यांनी ममता कुलकर्णीच्या संन्यासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुंभमेळ्यात रिल्स (Reels) बनवण्याच्या नावाखाली अश्लीलतेचा प्रसार होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सनातन धर्माचा खरा अर्थ सांगितला.

कुंभमेळा आणि रील्सचा वाढता प्रभाव

अलीकडील काळात, कुंभमेळ्यासारख्या धार्मिक उत्सवांमध्ये रील्स बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे. या रील्समध्ये अनेकदा धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपले जात नाही, आणि त्यातून अश्लीलतेचा प्रसार होतो. बाबा रामदेव यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांच्या मते, खरा कुंभमेळा तो आहे जिथे मानवतेपासून देवत्व, ऋषीत्व आणि ब्रह्मत्वाकडे वाटचाल होते. स्नान, ध्यान, योगाभ्यास, सत्य, प्रेम आणि करुणा, ध्यान योग, भक्ती योग, कर्मयोग, ही योगाची त्रिवेणी आहे, असे ते म्हणतात. सनातन म्हणजे शाश्वत अनुभवणे, शाश्वत जगणे आणि शाश्वतचा विस्तार करणे आहे, असेही त्यांनी (Baba Ramdev)  स्पष्ट केले.

संत होण्यासाठी ममता कुलकर्णींना वर्षानुवर्षे सराव…

ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद मिळाल्याबद्दल विचारले असता, बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी संतपद आणि त्यामागील साधनेचे महत्त्व अधोरेखित केले. “कोणीही एका दिवसात संत होऊ शकत नाही. त्यासाठी ममता कुलकर्णींला वर्षानुवर्षे सराव करावा लागेल. आज तुमच्यासमोर उभा असलेला स्वामी रामदेव देखील 50 वर्षांच्या तपश्चर्येनंतर या पदावर पोहोचला आहे,” असे ते म्हणाले.

संत होणे ही मोठी गोष्ट आहे आणि महामंडलेश्वर हे फार मोठे पद आहे, असे सांगत त्यांनी आजकाल कोणालाही महामंडलेश्वर बनवले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. “नावापुढे ‘बाबा’ जोडल्याने कोणी लगेच साधू-संत होत नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Title : Baba Ramdev Reacts on Mamata Kulkarni Mahamandaleshwar post 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now