भाड्याचे कपडे घेऊन बॉलीवुड स्टार करतात स्टायलिंग; प्रसिद्ध अभिनेत्याने केली पोलखोल

On: April 24, 2024 4:15 PM
Ayushmann Khurrana opens up about renting culture
---Advertisement---

Ayushmann Khurrana | बॉलीवुड कलाकारांचा एअरपोर्ट लुक असो किंवा कुठे बाहेर फिरायला गेले असतील तेव्हा त्यांनी काय घातलय, त्यांची फॅशन कशी आहे याबाबत पापाराझी नजर ठेऊनच असतात. त्यामुळे अगदी घरातून बाहेर पडताना कलाकारांना नेहमीच ट्रेंडी आणि स्टायलिश दिसावं लागतं. त्यांचेच्या गॉगल्सपासून चप्पलपर्यंत सर्वच काही महागडं आणि ब्रँडेड असतं.

बॉलीवुड अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याला कोणाची फॅशन सेन्स सर्वात जास्त आवडते याचा खुलासा करताना बॉलीवुडची पोलखोल केली आहे. बॉलिवूड कलाकारांच्या ड्रेसिंगवर अभिनेता आयुष्मान खुराना याने खरी हकीकत सांगितली आहे.

काय म्हणाला आयुष्मान खुराना?

“मला दिलजीत दोसांझची स्टाइलिंग खुप आवडते. जगभरातील लोक त्याला ओळखतात. मी संपूर्ण पंजाबसाठी खूप खुश आहे कारण दिलजीतमुळे पंजाब ग्लोबल प्लॅटफॉर्मवर पोहोचला”, असं आयुष्मान खुराना म्हणाला आहे.

पुढे त्याने कलाकारांच्या स्टाइलबाबत सांगितलं. “तुम्हाला काय वाटतं की आम्ही कपडे विकत घेतो? आम्ही स्टायलिश हायर करतो,ते आमच्यासाठी कपडे मागवतात आणि नंतर परत देऊन टाकतात.आम्ही एवढे कपडे कुठे ठेवणार ?,ट्रेंडसोबत पुढे जायचं असेल तर बॉलिवूड सेलेब्स कपडे विकत घेत नाहीत तर ते भाड्यानं घेतात.संपूर्ण बॉलिवूड रेंटवर आहे”. असा खुलासा आयुष्मान खुरानाने केला.

पुढे त्याने सांगितलं की, “माझा भाऊ अपारशक्ती खुरानाचा फॅशन सेन्स खुप चांगला आहे. पण मला त्यातलं इतकं कळत नाही. मी माझ्या प्रोफेशनच्या हिशोबानं फॅशन फॉलो करतो. फॅशनमध्ये मला तितकासा इंटेरेस्ट नाही”.

“सुरुवातीला जेव्हा मी अँकरिंग करत होतो तेव्हा अपारशक्ती माझा स्टायलिस्ट होता. मी त्याला सांगायचो माझी स्टायलिंग करुन दे. मी त्याबदल्यात त्याला पॉकेट मनी द्यायचो. यामुळे पैसे आमच्याच घरी यायचे.”,असंही आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) म्हणाला. आता त्याचं हे विधान चर्चेत आलं आहे.

News Title : Ayushmann Khurrana opens up about renting culture

महत्त्वाच्या बातम्या-

सुरतमध्ये काँग्रेसमुळेच भाजपचा पहिला विजय?, सगळी स्क्रिप्ट आधीच ठरलेली?

…म्हणून IPLमध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कधीच झाला नाही!

रील्स स्टार महिन्याला किती पैसे कमावतात? कमाई ऐकून व्हाल थक्क

“एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरून उरला…”

ग्राहकांना फटका! ‘या’ बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; RBI ने घातली बंदी

Join WhatsApp Group

Join Now