शेतकऱ्यांना सरकार देणाार मोफत उपचार, जाणून घ्या नवीन योजना!

On: March 22, 2025 1:27 PM
ayushman card yojana
---Advertisement---

Ayushman Bharat Yojana | देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Yojana) सुरू केली आहे. लाखो नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च मोफत मिळत असून, वाशिम जिल्ह्यातील हजारो कुटुंबांनी याचा लाभ घेतला आहे.

वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी काढले ‘आयुष्मान कार्ड’-

वाशिम जिल्ह्यातील 11.58 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ 5.05 लाख लोकांनीच ‘आयुष्मान कार्ड’ बनवले आहे. त्यामुळे उर्वरित पात्र नागरिकांनी तातडीने हे कार्ड मिळवावे, असं आवाहन आरोग्य विभागाच्या (Health Department) अधिकाऱ्यांनी केलं आहे. कार्ड नसल्यास योजनेचा लाभ घेण्यात अडथळा येऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ही योजना (Ayushman Bharat Yojana) भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठा आधार ठरली आहे. या अंतर्गत कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड व यकृताचे आजार, न्यूरोलॉजिकल विकार, मानसिक विकार आणि नवजात बालकांचे आजार अशा 1356 गंभीर आजारांवर मोफत उपचार दिला जातो. सर्व सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.

अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि उपचाराचा लाभ

‘आयुष्मान कार्ड’ काढण्यासाठी नागरिकांनी जवळच्या CSC (Common Service Center) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर संपर्क साधावा. अर्ज करताना आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पात्रता पत्र आवश्यक असते. नोंदणी दरम्यान मोबाईलवर येणारा OTP दिल्यास कार्ड त्वरित तयार होते.

ही योजना (Ayushman Bharat Yojana) सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देणारी ठरत आहे. विविध प्रकारच्या गंभीर आजारांवर आर्थिक अडचणीमुळे उपचार घेता न येणाऱ्या रुग्णांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही हे कार्ड काढलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर ते मिळवावे.

News Title : Ayushman Bharat Yojana for free treatment

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now