शेतकरी कर्जमाफीवर नवी अपडेट; महत्त्वाची माहिती समोर

On: July 14, 2026 10:06 AM
Pik Vima 2026
---Advertisement---

Farm Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल जाहीर केल्यानंतर शेतकरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची वाट पाहत आहेत. यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही आता 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

जुलैअखेरपर्यंत कर्जमाफीचा दावा

सुरुवातीला 30 जूनपर्यंत कर्जमाफी लागू होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे कारण देत 5 जुलैची नवी मुदत देण्यात आली. मात्र तीही पाळली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून, कर्जमाफीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जुलै महिना संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा दावा केला. त्यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच कर्जमाफीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

विलंबामागील कारण काय?

सरकारच्या माहितीनुसार, कर्जमाफीची अंमलबजावणी लांबण्यामागे नव्याने निश्चित करण्यात आलेले निकष हे मुख्य कारण आहे. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा तपशील केंद्र सरकार (Central Government) कडून मागवण्यात आला असून, हा डेटा प्राप्त झाल्यानंतरच अंतिम लाभार्थी यादी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कर्जमाफी जाहीर करता येणार नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. केवळ आर्थिकदृष्ट्या गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या प्रक्रियेवर भाष्य करत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मधील निकष बदलण्यासाठी आणि आयकर भरणाऱ्या तसेच सरकारी नोकरी करणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी चार महिने लागल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठीही वेळ लागू शकतो, असे त्यांनी म्हटले. तसेच ऑगस्टपूर्वी कर्जमाफी लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

News Title: Farm Loan Waiver July Update Maharashtra

Join WhatsApp Group

Join Now