Ayodhya Ram Mandir | कोणी लाख तर कोणी कोटी रूपये, राम मंदिर उभारणीसाठी ‘या’ कलाकारांनीही केलंय दान

On: January 22, 2024 4:25 PM
Ayodhya Ram Mandir Donation
---Advertisement---

Ayodhya Ram Mandir | राम भक्तांची 500 वर्षांची प्रतिक्षा आज (22 जानेवारी) संपली आहे. इतक्या वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत परतले आहेत. दुपारी साडे बारा वाजता मंदिर उद्घाटनाचा सोहळा पार पडला. यासाठी अयोध्येत भव्य तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

राम मंदिर उभारणीला मोठा इतिहास आहे. या मंदिर उभारणीसाठी देशभरातून खूप मोठं दान करण्यात आलं. यात कलाकारांचादेखील समावेश आहे. त्यात 8 कलाकारांचं नाव अधिक चर्चेत येत आहे. राम मंदिरसाठी आता पर्यंत 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्याचं म्हटलं जात आहे.

अक्षय कुमार

राम मंदिर उभारणीसाठी (Ayodhya Ram Mandir ) दान करणाऱ्या कलाकारांमध्ये पहिलं नाव अभिनेता अक्षय कुमार याचं आहे. अक्षय कुमारने 2021 मध्ये एक व्हिडीओ शेअर करत राम मंदिराच्या निर्माणसाठी दान केलं होतं. तसेच इतरांनीही यात सहभाग घ्यावा, असं आवाहनही त्याने केलं होतं. मात्र त्याने नेमकी किती रक्कम दान केली याबाबत काहीच खुलासा केला नाही.

अनुपम खेर

ज्येष्ठ अभिनेते अनुपण खेर यांनीही राम मंदिर उभारणीसाठी हातभार लावला. त्यांनी 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्यांनी मंदिराच्या निर्माणची एक झलक दाखवली होती. त्यामुळे त्यांनी देखील काही रक्कम दान केली आहे.

मुकेश खन्ना

शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी राम मंदिर उभारणीसाठी (Ayodhya Ram Mandir ) 1.11 लाख रुपये दान केले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त प्रणिता सुभाष यांनी 1 लाख रुपये दान केले होते.

गुरमीत चौधरी

अभिनेता गुरमीत चौधरी यानेही आपला हातभार लावला आहे. “राम मंदिराच्या उभारणीसाठी (Ayodhya Ram Mandir ) निधी गोळा करण्याचे काम संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात सुरू आहे. या शुभ कार्यासाठी आपणही प्रभू रामाच्या चरणी आपले काही सहकार्य अर्पण करू इच्छितो.”, अशी पोस्ट त्याने केली होती.

पवन कल्याण

साऊथ स्टार पवन कल्याण याने तब्बल 30 लाख रुपये मंदिर उभारणीसाठी दान केले आहेत. यासोबतच हेमा मालिनी, मनोज जोशी यांनीही दान केले आहे. मात्र, त्यांनी दान केलेली रक्कम सांगितलेली नाही. या कलाकारांसोबतच देशभरातून मंदिर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात दान करण्यात आले आहे.

News Title-  Ayodhya Ram Mandir Donation

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir Inauguration Day | अवधपुरी झाली राममय; सोहळ्यासाठी भल्या पहाटे ‘हे’ स्टार्स अयोध्येत दाखल

Team India | जय श्री राम…! भारतीय खेळाडूचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका

Join WhatsApp Group

Join Now