Ayesha Khan | “त्यांनी मला पहिल्या मजल्यावर नेलं आणि…”, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार

On: January 28, 2024 7:45 PM
Crime
---Advertisement---

मुंबई | ‘बिग बॉस 17’ मध्ये  वाईल्ड कार्ड म्हणून आलेली स्पर्धक आयेशा खान (Ayesha Khan) चर्चेचा विषय ठरली होती. शोमध्ये असताना आयेशा खानने (Ayesha Khan) मुनव्वर फारूकीवर अनेक आरोप केले होते. आता शोमधून बाहेर आल्यानंतर आयशानं आणखी एक खुलासा केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचं म्हटलं जात होतं.

आयेशा खानचा मोठा खुलासा

एका व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा खुलासा आयेशाने मुलाखतीमध्ये बोलताना केला आहे. त्यावेळी आयेशा खान 9 वर्षांची होती.

एका काकांनी मला आवाज दिला. मी वळले आणि मी विचारलं की हा काका बोला. त्यांनी म्हटलं इथे ये. मी गेले. त्यांनी मला विचारलं की हा पत्ता कुठे आहे. मी म्हटलं हो मला माहितीये. ती बिल्डिंग आहे. ते म्हणाले की बेटा मला तिथे पोहोचवशील. मी लगेच म्हटलं हो, चला ठीक आहे. काही हरकत नाही. आम्ही त्या बिल्डिंगमध्ये गेलो, तिथे पहिल्या माळ्यावर मी त्यांना घेऊन गेल्याचं तिने सांगितलं.

Ayesha Khan | “माझ्या तोंडावर हात ठेवून त्यांनी…”

पहिल्या माळ्यावरून जेव्हा आम्ही खाली उतरत होतो. तेव्हा त्यांनी मला शिड्यांवरून धक्का दिला. मग त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करणं सुरु केलं. त्यावेळी मला काही कळंत नव्हतं की नक्की काय होतंय, असं आयेशा म्हणाली.

मी फक्त पूर्णवेळ हेच बोलत होती की माझी आई तिथे उभी आहे, काका प्लीज मला जाऊ द्या. माझी आई तिथे उभी आहे. माझी आई तिथे उभी आहे, असं आयेशाने सांगितलं.

मला कळंत होतं की जे होतंय ते चुकीचं होतंय, पण काय होतंय हे कळत नव्हतं. एका 9 वर्षांच्या मुलीला काय कळत असेल. मी ओरडू शकत नव्हते. मला काही करता आलं नाही. त्यांचा हात माझ्या तोडांवर होते ते मला थांबवत होते, असा धक्कादायक प्रकार आयेशासोबत घडल्याचं तिने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Bihar Politics | मोठी बातमी! नितीश कुमार यांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune News | पुणे हादरलं, मराठी अभिनेत्रीवर मुळशीत बलात्कार!

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध, म्हणाले…

Manoj Jarange | ‘मनोज जरांगेंची औकात नाही, त्यांची लायकी नाही’; ‘या’ नेत्याचं जरांगेंना आव्हान

जीआर काढल्यानंतर Manoj Jarange यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now