अक्षय कुमारच्या ताफ्याने उडवलेल्या रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक, भावाने केली ‘ही’ विनंती

On: January 20, 2026 3:41 PM
Akshay Kumar Accident
---Advertisement---

Akshay Kumar Accident | मुंबईतील जुहू परिसरात सोमवारी रात्री अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षा वाहनाला मागून आलेल्या मर्सिडीज कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका रिक्षाचालकासह प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रिक्षाचालकाची तब्येत नाजूक असल्याचं सांगितलं जात असून, त्याच्या भावाने अक्षय कुमारकडे उपचार खर्चासाठी मदतीची विनंती केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय कुमारची इनोव्हा घराबाहेर पडत असताना तिच्या मागे एक ऑटो रिक्षा आणि त्याच्या मागे मर्सिडीज कार होती. मर्सिडीज चालकाने जोरात धडक दिल्याने आधी रिक्षाला आणि त्यानंतर सुरक्षा वाहनाला धडक बसली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे.

भावाची भावूक विनंती :

रिक्षाचालकाचा भाऊ मोहम्मद समीरने सांगितलं की, ही घटना रात्री साडे आठच्या सुमारास घडली. “माझा भाऊ रिक्षा चालवत होता. मागून आलेल्या मर्सिडीजने धडक दिल्यामुळे इनोव्हा रिक्षावर आदळली. या अपघातात माझा भाऊ आणि दुसरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. आम्हाला फक्त उपचार नीट व्हावेत आणि रिक्षाचं झालेलं नुकसान भरून मिळावं, एवढीच अपेक्षा आहे,” असं त्यांनी म्हटलं. (auto driver injured)

भावाने हात जोडून मदतीची विनंती करताना कोणत्याही प्रकारची अतिरिक्त मागणी नसल्याचं स्पष्ट केलं असून, उपचारासाठी सहकार्य मिळावं हीच अपेक्षा व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Akshay Kumar Accident | पोलिसांची कारवाई :

पोलिसांनी मर्सिडीज चालक राधेश्याम राय याच्याविरुद्ध वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ऑटो रिक्षा आणि मर्सिडीज कार जप्त करण्यात आल्या आहेत. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याने कोणतेही मादक पदार्थ सेवन केल्याचं आढळून आलेलं नाही. त्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे. (Akshay Kumar Car Accident)

या अपघातात अक्षय कुमार आणि त्याचं कुटुंब सुरक्षित राहिलं आहे. मात्र, मर्सिडीज अधिक वेगात असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, असं पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या जखमी रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

News Title: Auto Driver Critically Injured in Akshay Kumar’s Security Car Accident, Brother Seeks Help

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now