मोठी बातमी! संभाजी भिडे थोडक्यात वाचले, धक्कादायक माहिती समोर

On: March 1, 2024 2:55 PM
Attack on Sambhaji
---Advertisement---

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांची गाडी अडवत हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नाशिकच्या मनमाड येथे रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. येवला येथून मालेगावच्या दिशेने जात असतांना आंबेडकर अनुयायांनी त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवले. तसेच, जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

संभाजी भिडे मुर्दाबादच्या घोषणा

संभाजी भिडे मुर्दाबाद अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तसेच अश्लील शब्दातही घोषणा देण्यात आल्या. यावेळी काही तरुण आणि तरुणी यांनी भिडे यांच्या गाडीच्या समोर येऊन गाडीवर जोरजोराने हाताने मारत शिवीगाळ केली.

पोलिसांनी यात मध्यस्थी करत गाडी अडवणाऱ्यांना बाजूला केले. भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंतर मग भिडे (Sambhaji Bhide)आपल्या मार्गाने पुढे गेले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे संभाजी भिडे थोडक्यात बचावले आहे.

संभाजी भिडे यांच्यावर हल्ला

काही तरुणांनी पायातला बूट काढून भिडे यांच्या गाडीवर आदळला. विरोध करणाऱ्या तरुणांच्या हातात संभाजी भिडेंचा निषेध करणारे बॅनरदेखील होते. मनमाड येथून संभाजी भिडे (Sambhaji Bhide)मालेगावच्या दिशेने जाणार आहेत याची माहिती काही जणांना मिळाली होती.

पोलीस बंदोबस्तात भिडे यांची कार मनमाडमध्ये दाखल होताच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा आता निषेध केला जात आहे.

News Title –  Attack on Sambhaji Bhide car at Manmad

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी

‘हा’ शेअर करेल मालामाल; गुंतवणूकदारांना अंत्यत मोलाचा सल्ला

आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल!

‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा महत्वाचा इशारा

महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; जाणून घ्या आजचे भाव

Join WhatsApp Group

Join Now