संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्या?, मध्यरात्री घडली धक्कादायक घटना

On: July 21, 2025 3:36 PM
Sanjay Shirsat
---Advertisement---

Sanjay Shirsat | सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या कथित पैशांच्या बॅगचा व्हिडीओ, त्यानंतर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आणि आता थेट घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने वातावरण तापलं आहे. मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं? :

प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञात तरुणाने दगडफेक केली. एवढंच नाही तर, त्या तरुणाने परिसरात उघडपणे आरडाओरडही केली. ही घटना इतक्या गंभीर स्वरूपाची होती की, परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ घुले असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हल्ला करताना तो मद्यधुंद अवस्थेत होता, असे सांगण्यात येत आहे. सातारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

व्हिडीओ वाद, पैशांची बॅग आणि राजकीय खळबळ :

संजय शिरसाट यांच्यावर अलीकडेच इम्तियाज जलील यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ते सिगारेट ओढताना दिसत असून, बाजूला कथितरित्या पैशांनी भरलेली बॅग दिसते. या व्हिडीओनंतर “इतकी रोकड आली कुठून?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता.

Sanjay Shirsat | शिरसाट यांचा दावा – “व्हिडीओ मॉर्फ केलेला” “

या प्रकरणावर संजय शिरसाट यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. “व्हिडीओ माझ्या घरातलाच आहे, पण बॅगमध्ये पैसे नसून कपडे होते,” असा दावा त्यांनी केला. तसेच व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे असा आरोप करत, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला होता.

संजय शिरसाट हे शिंदे गटाचे महत्त्वाचे मंत्री असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा मजबूत गड मानला जातो. मात्र अलीकडे सातत्याने सुरू असलेल्या आरोप, टीका आणि हल्ल्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

News Title: Big Breaking: Attack Attempt on Minister Sanjay Shirsat’s House in Chhatrapati Sambhajinagar

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now