एटीएममधून पैसे काढणं आता महागात पडणार! आरबीआयने लागू केला ‘हा’ नवा नियम

On: March 19, 2026 7:56 PM
ATM Rule Change
---Advertisement---

ATM Rule Change | मार्च महिना संपत आला असून काही दिवसांतच एप्रिलची सुरुवात होणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बँकिंग क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल केले जातात. यावर्षीदेखील 1 एप्रिलपासून बँकांच्या काही नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. (UPI ATM withdrawal rule)

विशेषतः एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीशी संबंधित नियमात बदल होणार असल्याने अनेक ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. या बदलामुळे काही व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाण्याची शक्यता असून त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरही परिणाम होऊ शकतो.

UPI द्वारे एटीएममधून पैसे काढल्यास लागू होणार नवा नियम :

आतापर्यंत अनेक बँकांमध्ये एटीएममधून UPI च्या मदतीने पैसे काढण्याची सुविधा वेगळी मानली जात होती. त्यामुळे या व्यवहारांचा समावेश फ्री ट्रान्झॅक्शनच्या मर्यादेत केला जात नव्हता. परंतु आता या नियमात बदल करण्यात आला आहे.

1 एप्रिलपासून एटीएममधून UPI च्या माध्यमातून काढलेले पैसे हे फ्री ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये मोजले जाणार आहेत. म्हणजेच एटीएम कार्ड वापरून केलेल्या व्यवहारांप्रमाणेच UPI द्वारे काढलेले पैसे देखील त्या मर्यादेत गणले जातील. त्यामुळे जर तुम्ही वारंवार अशा प्रकारचे व्यवहार करत असाल तर तुमची फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट लवकर संपण्याची शक्यता आहे.

ATM Rule Change | फ्री लिमिट संपल्यानंतर किती आकारला जाईल चार्ज? :

काही प्रमुख बँकांनी या नियमाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे. यात HDFC Bank आणि Punjab National Bank यांसारख्या बँकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या बँकांच्या ग्राहकांना आता UPI द्वारे एटीएममधून पैसे काढताना नवीन नियम लागू होणार आहे. (ATM Rule Change)

फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांनी अतिरिक्त व्यवहार केल्यास प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी सुमारे 23 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे महिन्यात जास्त वेळा एटीएम व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी या बदलाची नोंद घेणे आवश्यक आहे.

1 एप्रिलपासून हा नवा नियम लागू होणार असल्याने ग्राहकांनी आपले एटीएम व्यवहार नियोजन करून करणे गरजेचे आहे. अन्यथा वारंवार पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते.

News Title: ATM Withdrawal Rule Change From April 1: UPI Cash Withdrawal Will Count In Free Transaction Limit

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now