“त्यावेळी पवार साहेब अजित पवारांना एक दिवसही पक्षात ठेवणार नाहीत”

On: January 28, 2023 11:34 AM
---Advertisement---

मुंबई | अजित पवार(Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांचा(Devendra Fadnvis) पहाटेचा शपथविधी आजपर्यंत जनता विसरू शकली नाही. बऱ्याचदा अजित पवारांना अजूनही यावरून भाजप आणि शिंदे गटाकडून टोला लगावला जातो.

नुकतेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील(Jayant Patil) म्हणाले होते की, पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते. जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

राजकी वर्तुळात खळबळ उडाल्यानंतर जयंत पाटलांनी आपल्या वक्तव्याची सारवासारव केली. परंतु या वादात आता भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी उडी घेत पहाटेच्या शपथविधीबाबत एक ट्विट केलं आहे.

पहाटेचा शपथविधी जर पवारांची खेळी होती तर खासदार सुळे या कॅमेरासमोर ‘माझं घर तुटतंय’ सांगून का रडल्या ?, असा सवाल राणेंनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

फडणवीस साहेबांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी अजित पवारांची इज्जत रस्त्यावर काढली नाही. ज्या दिवशी जगाला खर खळेल त्या दिवशी पवार साहेब अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत, असंही राणेंनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

राणेंच्या या ट्विटला आता राष्ट्रवादी नेते आणि अजित पवार काय उत्तर देतील, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now