चुकूनही ‘या’ दिवशी नखे कापू नयेत; अन्यथा या गोष्टींचा करावा लागेल सामना

On: April 1, 2024 1:58 PM
Astro Tips for Nail Cutting
---Advertisement---

Astro Tips for Nail Cutting l सनातन धर्मात मानवी जीवनाशी संबंधित सर्व कार्ये करण्यासाठी विशेष नियम केले आहेत. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की मंगळवार आणि शनिवारी नखे कापू नयेत. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रात सूर्यास्ताच्या वेळी आणि रात्री नखे कापणे निषिद्ध आहे. असे मानले जाते की यावेळी नखे कापल्याने धनाची देवी लक्ष्मी नाराज होते. तर आज आपण कोणत्या दिवशी नखे कापू नयेत हे जाणून घेणार आहोत…

Astro Tips for Nail Cutting l या दिवसात चुकूनही नखे कापू नका :

– ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी नखे चुकूनही कापू नका. मंगळवारी नखे कापल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि देवी लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे मंगळवारी नखे कापणे टाळावेत.

– याशिवाय शनिवारी देखील नखे कापू नयेत. असे मानले जाते की जो व्यक्ती शनिवारी नखे कापतो. त्यामुळे शनिदेव संतप्त होतात. ते लोकांच्या जीवनालाही घातक ठरू शकते.

– जर तुम्ही रविवारी नखे कापली तर असे केल्याने तुमच्या कामात अडथळा येईल आणि तुमचा आत्मविश्वास कमी होईल. त्यामुळे रविवारी नखे कापणे टाळावे.

या दिवशी तुम्ही नखे कापू शकता! :

ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी नखे कापणे चांगले मानले जाते. या दिवशी नखे कापणे शुभ मानले जाते. याशिवाय बुधवारीही नखे कापू शकतात. यामुळे तुम्हाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लग्नात नाही.

ज्योतिषशास्त्रात सोमवारी नखे कापणे चांगले मानले जाते. या दिवशी नखे कापल्याने तमोगुणापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. सोमवारचा संबंध भगवान शिव, चंद्र आणि मनाशी आहे. याशिवाय नखे कापण्यासाठीही बुधवारचा दिवस शुभ मानला जातो.

News Title- Astro Tips for Nail Cutting

महत्त्वाच्या बातम्या –

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार; SSC मध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

वर्कआउट दरम्यान ‘या’ चुका पडू शकतात महागात; अशी घ्या काळजी

अरे भाऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय रे? अन् त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी

पुण्यात चाललंय काय?; सोशल मीडियावर धंगेकरांचा ‘तो’ फोटो व्हायरल

Suzuki V-Storm 800DE बाईक बाजारात धुमाकूळ घालणार; होंडा कंपनीशी होणार तगडी स्पर्धा

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now