अखेर चेन्नईने फोडला बॉम्ब! ‘तो’ मोठा निर्णय घेतल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली

On: July 13, 2026 1:43 PM
Chennai Super Kings
---Advertisement---

Chennai Super Kings | इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या पुढील हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघातून मोठी बातमी समोर आली आहे. गेली अनेक वर्षे संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे स्टीफन फ्लेमिंग यांनी परस्पर संमतीने पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फ्रँचायझीच्या एका यशस्वी पर्वाचा शेवट झाला असून, चाहत्यांमध्ये पुढील हंगामाबाबत चर्चांना उधाण आले आहे.

18 वर्षांच्या प्रवासानंतर फ्लेमिंग यांचा निरोप :

आगामी आयपीएल हंगामात अनेक संघांमध्ये मोठे बदल आणि खेळाडूंचे ट्रेड पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्याने अनेक फ्रँचायझी संघरचनेत बदल करण्याच्या तयारीत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सने आपल्या प्रशिक्षकपदाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीच्या माहितीनुसार, स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) आणि संघ व्यवस्थापन यांच्यात अनेक चर्चेनंतर परस्पर संमतीने हा निर्णय घेण्यात आला.

न्यूझीलंड (New Zealand) संघाचे माजी कर्णधार असलेले फ्लेमिंग 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्समध्ये दाखल झाले होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. 2009 ते 2026 या कालावधीत त्यांनी महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांच्यासोबत यशस्वी जोडी तयार करत चेन्नईला आयपीएलमधील सर्वाधिक सातत्यपूर्ण आणि यशस्वी संघांपैकी एक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Chennai Super Kings | फ्लेमिंगच्या यशस्वी कारकिर्दीनंतर चर्चांना उधाण :

स्टीफन फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले, तसेच दोन वेळा चॅम्पियन्स लीग टी-20 (Champions League T20) स्पर्धेचे विजेतेपदही जिंकले. त्यांच्या कार्यकाळात संघाने विक्रमी 12 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर तब्बल 10 वेळा अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला जागतिक क्रिकेटमधील एक मजबूत आणि यशस्वी फ्रँचायझी म्हणून ओळख मिळाली.

फ्लेमिंग यांच्या प्रशिक्षकपदाच्या समाप्तीनंतर आता संघाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः महेंद्रसिंग धोनी यांच्याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. काही चाहत्यांना असे वाटत आहे की, फ्लेमिंग यांच्या जागी धोनी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारू शकतात. मात्र, यासंदर्भात चेन्नई सुपर किंग्सकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. धोनीने मागील हंगामात खेळले नसल्याने पुढील आयपीएलमध्ये त्याच्या खेळण्याच्या शक्यतेबाबतही विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत.

News Title: Stephen Fleming Exits CSK Coaching Role

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now