टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानी अधिकारी पळाला, वाचा नेमकं काय घडलं…

On: September 29, 2025 9:48 AM
Mohsin Naqvi Trophy Controversy
---Advertisement---

Mohsin Naqvi Trophy Controversy | आशिया कप 2025 च्या रोमांचक फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करून विजेतेपद पटकावले. मात्र, सामन्यानंतर घडलेल्या एका घटनेने वादाला तोंड फुटले आहे. एसीसी (Asian Cricket Council) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांनी आशिया कपची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची पदके घेऊन थेट आपल्या हॉटेलकडे कूच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Mohsin Naqvi Trophy Controversy)

ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाचा नकार :

फायनलनंतर झालेल्या सादरीकरण समारंभात मोहसिन नकवी स्टेजवर उपस्थित होते. मात्र, बीसीसीआयने (BCCI) त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्याऐवजी भारतीय संघाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांकडून ती ट्रॉफी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. या निर्णयामुळे नाराज झालेल्या नकवींनी सरळ ट्रॉफी आणि पदके उचलली आणि आपल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले.

बीसीसीआयच्या माहितीनुसार, “भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला याचा अर्थ असा नव्हता की नकवी यांनी ती परत घेऊन जावी. त्यांची कृती खेळाच्या भावनेच्या विरोधात असून ही असह्य आहे.”

Mohsin Naqvi Trophy Controversy | बीसीसीआयचा तीव्र निषेध :

बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, “भारत सध्या ज्या देशाशी युद्धस्थितीत आहे, त्या देशाच्या प्रतिनिधीकडून आम्ही कोणतीही ट्रॉफी किंवा बक्षीस स्वीकारू शकत नाही. म्हणूनच मोहसिन नकवींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास आम्ही नकार दिला.”

सैकिया यांनी पुढे सांगितले की, “नकवी यांनी ट्रॉफी आणि पदके आपल्या हॉटेलमध्ये नेणे हा अत्यंत निर्लज्ज आणि लाजिरवाणा प्रकार आहे. त्यांनी त्वरित ट्रॉफी भारताला सुपूर्द करावी, हीच आमची मागणी आहे.” (Mohsin Naqvi Trophy Controversy)

कारवाईच्या तयारीत बीसीसीआय :

या संपूर्ण वादग्रस्त प्रकारावर बीसीसीआयने कठोर नाराजी व्यक्त केली असून, ACC अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या वर्तनाविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.

“बक्षीस वितरण समारंभात जे काही घडले त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. यावर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असेल,” असेही देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले.

News Title : Asia Cup 2025 Trophy Controversy – Mohsin Naqvi Takes Trophy to Hotel, BCCI Slams Action

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now