11 दिवसांनंतरही शिवसेना पदाधिकारी गायब; धक्कादायक माहिती समोर

On: January 30, 2025 12:10 PM
Ashok Dhodi
---Advertisement---

Shivsena l शिंदे गटाचे (Shinde Group) पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे (Dahanu Assembly Constituency) समन्वयक अशोक धोडी (Ashok Dhodi) हे मागील अकरा दिवसांपासून बेपत्ता (Missing) आहेत. एक राजकीय पदाधिकारी बेपत्ता होऊन इतके दिवस उलटले, तरी पोलिसांना (Police) अद्याप धोडी यांचा शोध घेण्यात यश आलेले नाही.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या (CCTV Cameras) आधारे धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही पोलिसांना धोडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही.

अपहरणाच्या घटनेला 11 दिवस उलटून गेल्याने आणि धोडी यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने धोडी यांच्यासोबत घातपात (Assassination) घडला असावा, असा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धोडी यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या (Gujarat) दिशेने गेल्याचे एका सीसीटीव्हीत दिसून आले होते. पण त्यानंतर पोलिसांना धोडी यांच्या गाडीचा माग घेता आलेला नाहीये.

अशोक धोडींनी पत्नीला केला होता फोन :

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 20 जानेवारीला अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला (Wife) फोन केला होता. आपण डहाणूहून घरी येत असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. आता अकरा दिवसानंतरही त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. पाच आरोपींनी (Accused) धोडी यांचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे. हे पाचही आरोपी फरार असून यातील दोन आरोपी हे राजस्थानला (Rajasthan) पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.

परराज्यातील दारू तस्करीत अडचण ठरल्याने अपहरण? :

शिवाय पोलीस चौकीतून (Police Chowki) पळून गेलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. अशोक धोडी हे परराज्यातून होणाऱ्या दारू तस्करी (Liquor Smuggling) प्रकरणात अडचण ठरत होते. याच कारणातून त्यांचे अपहरण करून त्यांच्यासोबत घातपात केल्याचा संशय पोलिसांना आहे. दारू तस्करीतून संशयित आरोपींनी कोट्यवधींची माया जमवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

अशोक धोडी बेपत्ता प्रकरणात पोलीस तपासाला अद्याप म्हणावे तसे यश मिळालेले नाही. या प्रकरणात घातपाताची शक्यता बळावली असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून सत्य समोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

News Title: Ashok-Dhodi-Missing-Case-No-Progress-Even-After-11-Days-Police-Suspect-Assassination

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now