“उद्धव ठाकरे दिलदार आहेत, असा मुख्यमंत्री होणे नाही”

On: April 24, 2023 12:19 PM
---Advertisement---

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे एका जाहीर सभेत तोंडभरून कौतुक केलं आहे.

अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना, मविआ सरकार कोसळत होते त्यावेळीचा एक किस्सा सांगितला.

ज्यावेळेस सरकार कोसळत होते, त्यावेळी काही लोकांनी उल्लेख केला की काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून चाललो आहे, त्यानंतर उद्धवजी राजीनामा देण्यासाठी जात होते त्यावेळी मी त्यांना सांगितलं आमची भूमिका स्पष्ट आहे. जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेस पक्ष तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल, असं अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी सांगितलं.

तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले पाहिजे, तुम्ही तुमचा कार्यकाळ पाच वर्ष पुर्ण केला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now