घराला दीडशे पोलिसांचा बंदोबस्त, आमदाराने हात जोडून केली ‘ही’ विनंती!

On: October 31, 2023 4:18 PM
mumbai news
---Advertisement---

सोलापूर | मराठा आरक्षणसाठी राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जिवाचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार न करता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सतवा दिवस आहे.

जरांगे पाटील यांना राजकारणातील काही नेते मंडळी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यातच आता आपल्या पदाचा विचार न करता राजकीय नेत्यांनी राजीनामा दिला. माझी सहकार मंत्री आणि विद्यमान भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून जवळपास दीडशेहून अधिक पोलीस बंदोबस्त आमदारांच्या घराबाहेर लावण्यात आल्याची माहितीसमोर आली आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना सुभाष देशमुख सरकारला विनंती करत म्हणाले, मराठा आरक्षणावर तात्काळ चर्चा करून निर्णय घ्या.

जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आवाहन करुन देखील साखळी आंदोलनाला गालबोट लागत आहे. तर काल बीड येथे राजकीय नेत्याच्या घरांवर दगडफेक देखील करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now