Annabhau Sathe Fellowship | राज्य शासनाकडून मातंग समाजातील दहावीपासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना अंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना खास करून 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2025 आहे.
या योजनेचा प्रमुख उद्देश शिक्षणात गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात अडथळे येणार नाहीत. एकदा मिळणारी ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात मोठी मदत ठरू शकते. (Annabhau Sathe Fellowship)
पात्रता, कागदपत्रं आणि अर्ज प्रक्रिया :
ही शिष्यवृत्ती मातंग समाजातील 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी आहे. 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणात 60% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी पात्र ठरतात. निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर होते.
आवश्यक कागदपत्रं:
जातीचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड
गुणपत्रिका
बोनाफाईड सर्टिफिकेट
दोन पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड
बँक पासबुक
Annabhau Sathe Fellowship | अर्ज कुठे करायचा? :
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून त्यासोबत वरील सर्व कागदपत्रांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शहरातील अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात सादर करायचे आहेत. जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी अर्ज सादर करण्याचं आवाहन केलं आहे. (Annabhau Sathe Fellowship)






