‘आमच्या पप्पांनी गंम्पती आणला’ फेम चिमुकला आता ‘या’ मालिकेत दिसणार

On: April 27, 2024 1:06 PM
Appi Amchi Collector Marathi Serial
---Advertisement---

 Appi amchi Collector Marathi Serial | ‘झी मराठी’ वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर (Appi amchi Collector Marathi Serial) या मालिकेमध्ये अनेक चढउतार दाखवण्यात आले. या मालिकेला अनेक बाजूने वळण प्राप्त झालं. मालिका म्हटलं की टीआरपीचं गणित आलंच. टीआरपीसाठी चॅनेल किंवा मालिकेची टीम वाटेल ते करायला तयार असते. झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर मालिका एका कारणाने चर्चेत आलीये. या मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट घडताना दिसणार आहेत. एका बालकलाकाराची या मालिकेत एंट्री होणार असल्याची माहिती समोर आलीये.  (Appi amchi Collector Marathi Serial)

साईराज केंद्र मालिकेत दिसणार

आमच्या पप्पानी गंपती आणला या गाण्यावर घरोघरी पोहोचलेला साईराज केंद्रेला झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर मालिकेत संधी देण्यात आली. दरम्यान अप्पी आमची कलेक्टरचा नुकताच एक प्रोमो आला आहे. त्यामध्ये चिमुकल्याची सिंघम स्टाईलने एंट्री दाखवण्यात आली आहे. या मालिकेत आतापर्यंत बरेच बदल दाखवण्यात आले आहेत. (Appi amchi Collector Marathi Serial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेला वेगळं वळण

या मालिकेने तब्बल सात वर्षांचा लीप घेतलेला आहे. मालिकेमध्ये अप्पीची उत्तराखंडला बदली झालेली दाखवण्यात आलीये. यावेळी अर्जुन अप्पीसोबत जाणार की घरीच राहणार? असा सवाल त्याच्या समोर उपस्थित होता. अप्पी उत्तराखंडला जाण्याचा निर्णय घेते. तेव्हा अर्जुनला सर्व सोडून अप्पीसोबत जाणं अशक्य होऊन बसतं म्हणून तो अप्पीसोबत न जाण्याचा निर्णय घेतो.

अमोलच्या बाबाबद्दल अमोलला काही कळालं नाही पाहिजे असं अर्जुन अप्पीकडून वचन घेतो. अप्पी देखील वचन देते. मात्र आता अमोल आणि त्याचा बाबा अर्जुन यांची भेट होणार आहे. देवाच्या कृपेने सात वर्षांपासून दूर गेलेल्या मुलाची आपल्या बाबासोबत भेट होणार का? अर्जुनला कळेल का तो मुलगा आपलाच आहे? अप्पी आणि अर्जुन यांची भेट होणार का? अप्पी आणि अर्जुन आता पुन्हा कधी भेटतील? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मालिकेदरम्यान पाहायला मिळतील.

News Title – Appi amchi Collector Marathi Serial In Amchya Pappani Ganpati Anla Fame Child Actor Entry

 महत्त्वाच्या बातम्या

व्हिस्कीने लोकांना केले श्रीमंत; एका महिन्यात झाले पैसे दुप्पट

अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?

रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला

अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक

सचिन आणि सु्प्रिया पिळगांवकर यांची मुलगी खरंच दत्तक आहे का?, श्रियाने स्वतःच सत्य सांगितल्यानं मोठी चर्चा

Join WhatsApp Group

Join Now