Apoorva Shukla | मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर; 35 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू

On: December 24, 2023 7:48 PM
Anubhav Shukla
---Advertisement---

भोपाळ | अभिनेता अपूर्व शुक्ला (Apoorva Shukla) यांचं निधन झालं आहे. बुधवारी भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये अभिनेत्याचा मृत्यू झाला. अपूर्व शुक्ला याच्यावर अनेक महिन्यांपासून डिप्रेशनवर उपचार सुरू होते. चित्रपट, माहितीपट आणि पत्रकारिता विश्वातही त्याने अनेक छोट्या भूमिका केल्या आहेत.

35 व्या वर्षी Apoorva Shukla चा मृत्यू

पोलिसांनी सांगितलं की, त्यांना 20 डिसेंबर रोजी रात्रीच्या निवारागृहात राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

पोलिसांना मृत अपूर्व शुक्लाच्या खिशातून एक स्लिप सापडली, ज्यावर एक फोन नंबर लिहिलेला होता. त्या नंबरवर फोन केला असता ती अपूर्व शुक्लाची मावशी असून, अपूर्व शुक्ला असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचं समजलं.

अपूर्व शुक्ला हे थिएटर आर्टिस्ट आणि पत्रकार देखील होते. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. वडिलांच्या निधनानंतर अपूर्व शुक्ला डिप्रेशनमध्ये गेल्याचं अभिनेत्याच्या मावशीने सांगितलं.

अपूर्व शुक्लाला कटनीमध्ये आपल्यासोबत राहण्यास सांगितलं होतं, परंतु त्यांनी नकार दिला. अपूर्व शुक्लाचे वडीलही पत्रकार होते, तर आई वकील होती. तो आधी जहांगीराबाद येथे आई-वडिलांसोबत राहत होता.

सर्व काही व्यवस्थित चालले होते. मात्र तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झाल्याने अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईची सावली डोक्यावरून उठल्यानंतर अपूर्व शुक्ला शॉकमध्ये जगू लागला. यातूनही तो सावरू शकला नाही की आई गमावल्यानंतर अवघ्या वर्षभरातच वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर अपूर्व शुक्ला डिप्रेशनमध्ये गेला. सर्वांशी संपर्क तोडला आणि रात्रीच्या निवाऱ्यात राहू लागला.

अपूर्वने तसेच अमिताभ बच्चन, अजय देवगण, अर्जुन रामपाल, करीना कपूर आणि सिद्धार्थ राय यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर

Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

Tanaji Sawant | तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतील महत्त्वाची माहिती हाती

“Aishwarya Rai नाही, मी अभिषेकची पहिली पत्नी”; अभिनेत्री जान्हवी कपूरच्या दाव्याने उडाली होती खळबळ

Hardik Pandyaला आणखी एक लॉटरी लागणार?, Rohit Sharmaच्या नावाचाही होऊ शकतो विचार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now