Uddhav Thackeray | शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर; ठाकरेंना पुन्हा धक्का

On: December 10, 2023 3:09 PM
Maharashtra Politics
---Advertisement---

मुंबई | एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची महाराष्ट्रात युती आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदरांसह भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. तेव्हापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला रामराम करत अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Uddhav Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का

पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडीचे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि सौ. अश्विनी हांडे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

Eknath Shinde 1

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी हांडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत केलं. तसंच त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हांडे यांच्यासोबतच ठाकरे गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच उपशाखाप्रमुख राजूभाई शिर्सेकर, हसमुख महाराज रावल, रमाकांत झगडे, रोहित बोऱ्हाडे, अमोल गाढवे, राकेश बोढेकर, युवा सेना अधिकारी संतोष मोरे, चंद्रकांत कुंजीर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

दरम्यान, मुंबई स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले असून संपूर्ण शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावं, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत मी स्वतः सहभागी होत असून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

उबाठा गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच उपशाखाप्रमुख राजूभाई शिर्सेकर, हसमुख महाराज रावल, रमाकांत झगडे, रोहित बोऱ्हाडे, अमोल गाढवे, राकेश बोढेकर, युवा सेना अधिकारी संतोष मोरे, चंद्रकांत कुंजीर यांनीही पक्षात प्रवेश केला.

 

महत्त्वाच्या बातम्या-

Weather Update | सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय?, हवामान विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला

Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती!

Hampi | अत्यंत कमीत कमी बजेटमध्ये हम्पीला कसे फिरुन यायचे?

Gautam Gambhir | प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या अडचणी वाढल्या, ‘या’ कारणामुळे होणार मोठी कारवाई?

INDvSA | दक्षिण आफ्रिका-भारत मालिकेपूर्वी मोठा झटका, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now