WhatsApp चे अजून एक भन्नाट फिचर

On: January 25, 2023 2:43 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | मॅसेज, टेक्सटिंग यांसारख्या गोष्टीसाठी आपण इंस्टट मॅसेजिंग अ‌ॅप वापरतो. अनेकांना व्हाटसअ‌ॅप (WhatsApp) हे वापरण्यासाठी अगदी सोपं आणि सुविधायुक्त वाटतं. याच व्हाट्सअ‌ॅपनं अनेक नववनीन फिचर्स सध्या आणले आहे. पूर्वीपेक्षा व्हाट्सअ‌ॅपमध्ये प्रचंड अपडेट करण्यात आलं आहे.

नवीन आलेल्या फिचरबद्दल WABetaInfo ने माहिती दिली आहे. या आलेल्या फिचरनुसार आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीला फोटो पाठवयाचा असेल तर तुम्ही त्याची क्वालिटी (Quality) सिलेक्ट करु शकणार आहात. फोटो पाठवताना तुम्ही आता फोटोचं resoultion देखील सिलेक्ट करु शकता.

यामध्ये फोटो पाठवत असताना तुम्हाल तीन ऑप्शन येतील. युजर्स ऑटोमॅटिक (Users Automatic),डाटा सेवर (Data Saver) आणि बेस्ट क्वालिटी या तीनपैकी तुम्ही ठरवू शकता. यामुळं तुम्हाला कमी गरजेचे फोटो डाटा सेवरनुसार पाठवता येतील. तसेच तुम्ही ओरिजनल फोटो सुद्धा सेंटिगमध्ये बदल करुन पाठवू शकता.

व्हाट्सअ‌ॅप युजर्संना अनेक दिवस या फिचरची (Features) प्रतिक्षा होती. यापूर्वी हाय क्वालिटी फोटो पाठवण्यासाठी अडचण होत होती. ते फोटो अनेकदा फुटत असत. त्यामुळे अनेकदा डाॅक्युमेंटनी ते फोटो पाठवले जायचे. या नव्या फिचरमुळे मात्र आता सगळ्यांनाच सोपं झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now