Anna Idli | पुण्यात अण्णा नावावरुन पेटला वाद!, कोर्टानं दिला महत्त्वाचा आदेश

On: December 2, 2023 9:01 PM
Anna Idli
---Advertisement---

पुणे (Anna Idli)  | पुणे तेथे काय उणे ही म्हण चांगलीच प्रचलित आहे. पुण्यात कुठल्या गोष्टीवरुन काय होईल याचा कुणालाच अंदाज बांधता येणार नाही. आता असाच काहीसा प्रकार अण्णा या नावावरुन घडला आहे. हे नाव नेमकं कोणाचं यावरुन सुरु झालेला वाद थेट कोर्टात पोहोचला आहे.

नेमका काय प्रकार घडला आहे?

पुण्यातील एफसी कॉलेजसमोरील शिरोळे रस्त्यावर नव्यानेच अण्णा नावाचं एक साऊथ इंडियन पद्धतीचं रेस्टॉरंट सुरु झालं आहे. अण्णा इडली (Anna Idli) या नावानं पुण्यासह काही शहरांमध्ये व्यवसाय करणाऱ्या शांतप्पा यांनी या रेस्टॉरंटच्या नावावर आक्षेप घेतला आहे.

पुण्यात आले अण्णा इडली गृह नावाने हॉटेल आहे, आपली ही आस्थापना नोंदणीकृत असून तसे प्रमाणपत्र आपल्याकडे असल्याचा त्यांचा दावा आहे, त्यामुळे या नावाने व्यवसाय करण्यास त्यांचा विरोध आहे. या प्रकरणी त्यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मेसर्स अण्णा यांना ‘अण्णा’ हे नाव वापरण्यास अंतरिम मनाई करावी, अशी शांतप्पा यांची मागणी होती.

दरम्यान, दिवाणी न्यायालयाने या प्रकरणी शांतप्पा यांचा दावा फेटाळून लावला, त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतरिम मनाई आदेश देण्यास नकार दिला आहे. मात्र या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिवाणी न्यायालयाला दिले आहेत.

याचिकाकर्त्यांचा (Anna Idli) काय दावा आहे?

‘अण्णा इडली’ या नावाचा ट्रेडमार्क आपल्याकडे आहे. अण्णा इडली गृह या नावाने आपण त्याची नोंदणी केलेली आहे. इडली, डोसा यासारखे दक्षिण भारतीय पदार्थ या व्यवसायाद्वारे विकले जातात. पुण्यासह संपूर्ण भारतात या नावाने आपल्या शाखा आहेत. त्यामुळे हे नाव वापरण्यास शिरोळे रोडवरील रेस्टॉरंटला मनाई करावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

पुण्यात साऊथ इंडियन पदार्थ म्हटलं की मोजकी नावं समोर येतात. अण्णा इडली पुण्यात यासाठी प्रसिद्ध होतं. त्यातच आता शिरोळे रोडवर नवी अण्णा नावाने रेस्टॉरंट सुरु झालं आहे. ग्राहकांची पसंती सुद्धा या रेस्टॉरंटला मिळताना दिसत आहे. त्यामुळे आता अण्णा हे नाव कुणाला मिळणार याची पुणेकरांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

News Title: anna idli south indian restaurant in pune

महत्त्वाच्या बातम्या-

Petrol Diesel Price | लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार!, सर्वात मोठं कारण आलं समोर

Leopard Cubs | धक्कादायक!!! मांजरीची पिल्लं म्हणून चुकून आणली बिबट्याची पिल्लं… पुढे घडली थरारक घटना

Weather Update | नव्या वादळाची एन्ट्री, महाराष्ट्राच्या ‘या’ भागांवर मोठं संकट

Gold Price Today | सोन्याचे दर भिडले गगनाला, पाहा किती रुपयांची झाली वाढ

Government Strike | ‘या’ कारणामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी संपावर!

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now