Bigg Boss 17 | अंकिता-विकीचं भांडण बाजूलाच, ‘सासूबाई’लाच सुनावले जातायेत खडेबोल

On: January 10, 2024 9:09 PM
Ankita Lokhande Vicky Jain Controversy
---Advertisement---

Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) हा शो सध्या अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या भांडणामुळे चांगलाच चर्चेत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या जोडप्यांच्या भांडणाने या शोची रंगत वाढवली. त्यात अंकिताची आई आणि तीच्या सासूच्या एन्ट्रीनेही प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. मात्र, सध्या अंकिताच्या सासूला सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

‘फॅमिली वीक’ टास्कदरम्यान ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांना त्यांच्या कुटंबातील सदस्य भेटायला आले होते. याच एपिसोडमध्ये विकीची आई मुलगा विकी आणि सून अंकिताला भेटण्यासाठी आली होती. या भेटीत अंकिता व विकीच्या आईमध्ये भांडण झाले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. यावर अभिनेत्री कंगना रनौतनेही पोस्ट करत टीका केली होती. आता कंगनानंतर बिग बॉसची पूर्व स्पर्धक रश्मी देसाईनेही अंकिताच्या सासूवर टीका केली आहे.

अंकिताची सासू सोशल मिडीयावर ट्रोल

तू जशी आहेस तशीच रहा. तू स्वतःमध्ये खूप बदल केले आहेस आणि ते फक्त तुझ्यापुरतेच नाही. तू सर्व काही साध्य केले आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला याची कधीच गरज नव्हती, पण तू ते खूप प्रेमाने स्वीकारलंस, असे रश्मी देसाई म्हणाली आहे.

पुढे रश्मी म्हणाली कि, “मला आशा आहे की घरच्यांना समजेल की हा शो संपणार आहे. आणि हे फक्त अंकिताबद्दल नाही तर दोघांबद्दल आहे. त्यांचे प्रॉब्लेम ते सांभाळून घेतील. ते दोघेही समजदार आहेत. अंकिता आणि विकी दोघेही माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे तुम्ही (विकीची आई) बाहेर बिग बॉस (Bigg Boss 17) खेळू नका. आयुष्य अजून बाकी आहे.”, असा थेट सल्लाच रश्मीने विकीच्या आईला दिला आहे.

कंगना रनौतने केली टीका

यापूर्वी कंगनाने आपल्या इनस्टाग्राम स्टोरीवर अंकिताच्या सासूचा हा व्हिडिओ पोस्ट करत टीका केली होती. “मीडिया तुमच्या कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न करतेय. अंकिताची सासू तिला कशी मदत करते, हे ते तुम्हाला दाखवणार नाहीत. रिएलिटी शो येतील आणि जातील. मात्र, कुटुंब कायम सोबत असतं. मला वाटतं अंकिताने हा शो जिंकावा पण, यासाठी तिला तिच्या वैवाहिक आयुष्याची किंमत मोजावी लागू नये.” असे कंगना म्हणाली होती. यानंतर रश्मी देसाईने दिलेला सल्ला आता चर्चेत आला आहे.

विकी जैन याची आई रंजना जैन यांनी अंकिता वर अनेक आरोप केले होते. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मिडियावर व्हायरल झाला. यानंतर विकीच्या आईवर प्रचंड टीका केली जात आहे. शो (Bigg Boss 17)बद्दल बोलायचे म्हटले तर बिग बॉसचा हा सतरावा सीजन आता अंतिम फिनालेकडे वाटचाल करत आहे. येत्या 28 जानेवारीला याच्या विजेत्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

News Title- Bigg Boss 17 Ankita Lokhande Vicky Jain Controversy 

महत्त्वाच्या बातम्या- 

Maharashtra Politics | सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, ठाकरेंना धक्का

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंचा स्वत:च्याच पायावर धोंडा?; ‘ती’ चूक पडली महागात

Shiv Sena MLA Disqualification | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना पहिला धक्का!

Shiv Sena MLA Disqualification LIVE | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल वाचा जसाच्या तसा

Shiv Sena MLA Disqualification Case | निकाल विरोधात लागला तरी ठाकरेंचा प्लॅन बी तयार, अशी असणार योजना

Join WhatsApp Group

Join Now