पती विकी जैनला घटस्फोट देण्याबद्दल अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

On: March 11, 2024 2:20 PM
Ankita Lokhande big revelation about Vicky Jain
---Advertisement---

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन यांच्या (Vicky Jain) वैवाहिक आयुष्यातील वाद ‘बिग बॉस 17’ या शोमध्ये दिसून आले. या शोमध्ये प्रत्येक दिवशी त्यांच्यात भांडण व्हायची. बऱ्याचदा तर त्यांची भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचली होती.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता विकीला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांवर मोकळेपणे व्यक्त झाली. तिने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा यावेळी केला. त्यामुळे पुन्हा एकदा अंकिता आणि विकी चर्चेत आले आहेत.

अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा

“मला असं वाटतं की हे माझं आयुष्य आहे. जर मला एखादी व्यक्ती माहीत असेल, त्या व्यक्तीविषयी मला काही चांगली माहिती असेल तर त्याबद्दल मी नक्कीच बोलेन. यासाठी मला कोणीच थांबवू शकत नाही. याव्यतिरिक्त जर तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर ती तुमची मतं आहेत. त्यावर मी काहीच बोलू शकत नाही”, असं अंकिता (Ankita Lokhande) म्हणाली.

तसंच पुढे बोलताना ती म्हणाली की, “तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर, त्यावर तुम्ही प्रेम करत राहीलं पाहिजे. त्याच्या डोक्यावर बसून जरी नाचलात तरी काही फरक पडत नाही. कारण जर तो तुमच्यावर प्रेम करत असेल, तर तो तुमच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहील. तो दुसरीकडे कुठेच जाणार नाही”, असा खुलासा यावेळी अंकिताने केला.

‘बिग बॉस 17’ मध्ये अंकिता-विकित सतत वाद व्हायचे

‘बिग बॉस 17’मध्ये अंकिता आणि विकी यांच्यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंहमुळे देखील वाद झाल्याचं दिसून आलं. अंकिता शो मध्ये सतत त्याचा उल्लेख करायची.यामुळे विकी आणि त्याच्या कुटुंबियांना बराच त्रास व्हायचा, त्यामुळे शोमध्ये अंकिताच्या आईने हजेरी लावत तिची समजूत घातली होती.

अंकिताची सासू रंजना जैन यांनी देखील अंकितावर गंभीर आरोप केले होते. तेव्हा अंकीताची बाजू घेण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले होते. यात अभिनेत्री कंगना रनौतचा देखील समावेश होता. तेव्हा रंजना जैन यांना ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र, बिग बॉस संपताच अंकिता आणि विकी पुन्हा आनंदाने राहत असल्याचं दिसून आलं.त्यांनी सोबत नंतर पार्टी देखील केली होती.आता अंकिताने (Ankita Lokhande) घटस्फोटाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देत सर्वांचीच तोंडं बंद केली आहेत.

News Title-  Ankita Lokhande big revelation about Vicky Jain

महत्त्वाच्या बातम्या –

“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र

अखेरच्या चेंडूवर सनसनाटी निर्णय! 1 धाव अन् बरेच काही; स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!

Join WhatsApp Group

Join Now