अभिनेत्रींचं सौंदर्यही पडेल फिकं, अंबानीच्या सोहळ्यातील ‘खास’ व्यक्तीने वेधलं लक्ष

On: March 6, 2024 6:52 PM
Anjali Merchant
---Advertisement---

Anjali Merchant | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. 1 मार्च ते 3 मार्चपर्यंत चाललेल्या या प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. या प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक मोठ्या कलाकारांनी परफॉर्म केलं. मात्र, अंबानींच्या या भव्यदिव्य फंक्शनमध्ये एक खास (Anjali Merchant) व्यक्ती प्रकाशझोतात आली आहे.

सध्या अनंत आणि राधिका नव्हे तर अनंत अंबानीच्या मेहुणीचीच जास्त चर्चा रंगली आहे. अनंत अंबानीची मेहुणी आणि राधिका मर्चंटची बहिण अंजली मर्चंट मजिठिया नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.

कोण आहे अंजली मजिठिया?

अंजली मर्चंट मजिठिया (Anjali Merchant) ही ‘एनकोअर फार्मस्युटिकल्स’चे सीईओ वीरेन मर्चंट आणि त्यांची पत्नी शैला मर्चंट यांची मोठी मुलगी आहे. तर राधिका ही त्यांची लहान मुलगी आहे. अंबानी यांच्या सोहळ्यात अंजलीबद्दल अधिक बोललं जातंय.

1989 मध्ये मुंबईत जन्मलेल्या अंजली मर्चंट मजिठियाने ‘द कॅथेड्रल’, ‘जॉन कॉनन स्कूल’ आणि ‘एकोल मोंडियाले वर्ल्ड स्कूल’मधून शिक्षण पूर्ण केलं. ती स्वत: उद्योजिका असून ती ‘टर्न द कॅम्पस’ या ऑनलाइन मार्केटप्लेसची सहसंस्थापिका आहे.

अंजली मजिठियाच्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ

यासोबतच अंजली (Anjali Merchant) ‘ड्रायफिक्स’चीही सहसंस्थापिका आहे. तिने 2020 मध्ये बिझनेसमॅन अमन मजिठियाशी लग्न केलं. आता अंजली राधिका आणि अनंत यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामुळे चर्चेत आली आहे. अंजलीच्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडली आहे.

या सोहळ्यात बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.मात्र, अंजलीने सर्वांचे लक्ष वेधलं. एक वेगळी स्टाइल, कलरफुल आणि सुंदर पोशाख सोबत अंजली खूपच सुंदर दिसत होती. तिचे फोटो आता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी तिच्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अभिनेत्री पेक्षाही ती सुंदर दिसतेय, असं नेटकरी म्हणत आहेत.

News Title- Anjali Merchant photos went viral on social media

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले

850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय

Join WhatsApp Group

Join Now