संतोष देशमुखांचं पोस्टमार्टम करणाऱ्या सर्जनवर गंभीर आरोप; नवं कनेक्शन समोर आल्याने खळबळ

On: January 27, 2025 9:33 AM
Santosh Deshmukh Murder
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder l संतोष देशमुख हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Murder Case) दररोज नवे वळण मिळत असून, या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) मिळत असलेल्या सुविधांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाल्मिक कराडविषयी सातत्याने धक्कादायक खुलासे करणाऱ्या दमानिया यांनी आता बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर (X) केलेल्या पोस्टमध्ये, अंबेजोगाई (Ambejogai) येथील ‘हॉटेल पियुष इन’ (Hotel Piyush Inn) कोणाचे आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. “मला अशी माहिती मिळतेय की, हे हॉटेल डॉ. अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत,” असे दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढे त्यांनी असेही नमूद केले आहे की, डॉ. अशोक थोरात हे पूर्वी नाशिकला (Nashik) होते आणि नंतर बड्या व्यक्तीच्या आशीर्वादाने त्यांची बदली बीडला (Beed) झाली.

डॉ. अशोक थोरातांचे स्पष्टीकरण :

या आरोपांसंदर्भात डॉ. अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “मी २१ तारखेपासून ३१ तारखेपर्यंत रीतसर रजेवर आहे. माझा आणि वाल्मिक कराड यांच्या उपचाराचा काहीही संबंध नाही.”

Santosh Deshmukh Murder l चौकशीची मागणी :

दमानिया यांच्या या आरोपानंतर ‘हॉटेल पियुष इन’ नेमके कोणाच्या मालकीचे आहे आणि डॉ. अशोक थोरात यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

News Title: anjali-damania-serious-allegations-on-civil-surgeon-ashok-thorat-in-santosh-deshmukh-murder-case

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now