Munawar Faruqui | ‘त्याला पोरींसोबत…’; अंजली अरोराचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

On: January 3, 2024 12:03 PM
Munawar Faruqui
---Advertisement---

Munawar Faruqui | सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस 17 मध्ये कॉमेडियन मुनावर फारुकीच्या (Munawar Faruqui) लव्ह लाईफचा खुलासा झाला आहे. मुनव्वर फारुकीने शोमध्ये नाझिला सिताशीच्या प्रेमात असल्याचा दावा केला होता, परंतु त्यानंतर आयशा खानने त्याच्यावर डबल डेटचा आरोप केला होता.

अंजली अरोराचा Munawar Faruqui वर गंभीर आरोप

आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात मुनव्वर आणि आयशा खान यांच्यात जवळीक पाहायला मिळत आहे. त्याचवेळी मुनावर फारुकीसोबत (Munawar Faruqui) लॉकअपमध्ये दिसलेली अंजली मुनावरवर चांगली भडकली आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली अरोरा सतत बिग बॉस 17 वर लक्ष ठेवून आहे, ज्यामुळे तीने या गेमवर आणि मुनावर फारुकीबद्दल तिचं मत व्यक्त केलंय. अलीकडेच अंजली अरोरा शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट शोमध्ये सामील झाली. यावेळी त्याला मुनव्वर आणि त्याच्या खेळाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. अंजलीला लॉकअपच्या दिवसांबद्दल प्रश्न विचारलं जात होतं, पण तीने प्रश्न विचारू नका अशी विनंती केली.

या चॅट शोमध्ये अंजली अरोराने मुनावर फारुकी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. मुनवर फारुकीला आपल्या शब्दांसोबतच मुलींसोबत कसं खेळायचं हे माहित आहे. तो सर्व मुलींना त्याच ओळीची पुनरावृत्ती करतो. अजून किती मुलींची नावे यायची आहेत कुणास ठाऊक, असं अंजली म्हणालीये.

“Munawar Faruqui ने अनेक मुलींच्या जीवाशी खेळ केला”

मी 72 दिवस त्या व्यक्तीसोबत राहिले आहे, मला त्याच्याबद्दल इतकं समजलं आहे की तो कसा आहे. त्याने अनेक मुलींच्या जीवाशी खेळ केला आहे. मी त्याची खूप चांगली मैत्रिण होते. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल मला बोलायचं नाही, असं अंजली म्हणालीये.

दरम्यान, अंजील अरोरा आणि मुनावर फारुकी रिअॅलिटी शो लॉकअपमध्ये एकत्र दिसले होते. यावेळी दोघांमध्ये घट्ट मैत्री दिसून आली. अंजलीने शोमध्ये मुनव्वरला आय लव्ह यू सुद्धा म्हटलं होतं, त्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा करण्यात आला होता. अनेकवेळा अंजली आणि मुनव्वर यांची नावे एकत्र घेण्यात आली. मात्र, यानंतर दोघेही वेगळे झाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ramdas Athawale | “अयोध्येत राम मंदीर किंवा बाबरी मशीद नव्हती, तर”; रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

Mahanand Dairy | महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी; आणखी एक व्यवसाय गुजरातकडे?

Aishwarya Rai Bachchan | घटस्फोटाच्या चर्चेनंतर अभिषेक पहिल्यांदाच बोलला, म्हणाला…

Rohit Sharma | रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, वर्षाच्या सुरुवातीला देणार धक्का!

Rohit Sharma | …अखेर रोहित शर्मानं दिला होकार!, BCCI लवकरच जाहीर करणार गुडन्यूज

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now